आधुनिक शेतीकडे लोणी गावाची वाटचाल
हे गांव जळगांव शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील शेतकरी खरीप हंगामात कापूस, केळी व भाजीपाला पिके घेतात
आधुनिक शेतीकडे लोणी गावाची वाटचाल
लोणी ( जि. जळगांव ) हे गांव जळगांव शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील शेतकरी खरीप हंगामात कापूस, केळी व भाजीपाला पिके घेतात त्याचप्रमाणे - रब्बी हंगामात भुईमूग, हरभरा, गहू आणि इतर पिकांची पारंपारीक पध्दतीने लागवड करत होते. मात्र मागील चार पाच वर्षापूर्वी बाजारपेठेचा अंदाज घेत शेतकरी कलिंगड, पपई लागवडीकडे वळले .
लोणी गावात दरवर्षी सुमारे 50 हेक्टरवर कापसाची पूर्वहंगामी लागवड होते. केळीची मृग आणि कांदेबाग लागवड असते. गावाचे एकूण लागवड क्षेत्र सुमारे 400 हेक्टर आहे. यातील सुमारे 170 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. या क्षेत्रात केळी, ऊस आणि कापसाची लागवड असायची, परंतु मागील पाच वर्षात बदल झाले. आता गावातील 85 हेक्टरवर कलिंगड आणि त्यात पपईचे आंतरपीक आहे. पूर्ण क्षेत्रासाठी आच्छादन आणि ठिंबक सिंचनाचा वापर केला जातो. केळीतही आंतरपीक म्हणून कलिंगड, खरबूज लागवड केली जाते.
शिवार भेटीतून अभ्यास साधला :-
धुळे जिल्ह्यातील वडजी सौंदाणे गावातील शेतकरी पपईचू शेती उत्तम प्रकारे करतात हे माहित झाल्यावर सोबतचे मित्र एकत्र होवून थेट उत्पादकांशी भेट साधली व गुणवत्तापुर्ण पपई उत्पादना बाबत माहिती मिळवली. सतत भोवतालच्या परीसरात फिरुन शिवार फेरीतुन या गावातील लोकांनी तसेच नरेंद्र पाटील यांच्या शेतकरी मित्रांनी नवीन प्रयोग करण्याचा मानसच केलेला दिसून येतो.
बदल महत्वाचा ठरला :-
लोणी गावातील नरेंद्र पाटील यांनी वडजी सौंदाणेला भेट दिल्याच्या दुस-या वर्षी जानेवारी महिन्यात पन्नास आर क्षेत्रावर कलिंगड आणि त्यामध्ये पपईचे आंतरपीक लागवडीचे नियेजन केले. मात्र बेमोसमी पावसाने कलिंगडाची रोपे खराब झाली, 65 टक्केच रोपे जगली. त्याच क्षेत्रात फेब्रुवारीत पपईची आठ बाय आठ फुटांवर लागवड केली. कलिंगड, पपई विक्रीतून त्यांना चांगले उत्पादन मिळाले. 2015 मध्ये त्यांनी पुन्हा एक हेक्टरवर जानेवारीत कलिंगडाची लागवड केली. फेब्रुवारीत त्याच क्षेत्रात पपईचे आंतरपीक घेतले. कलिंग़ास सात रुपये प्रतिकिलो दर मिळाला आणि पपईला प्रतिझाड 200 रुपटे असा ठोक दर व्यापा-याने दिला. यातून चांगला आर्थिक नफा मिळाला.
तंत्रज्ञानाचा प्रसार :-
नरेंद्र पाटील यांना पीक बदलात मिळालेले आर्थिक यश पाहून यांच गावातील अभिमन पाटील, गोपाळ पाटील, गोकुळ पाटील, पांडूरंग पाटील, लीलाधर पाटील, भरत पाटील, फजल शेख आदी शेतक-यांनी 2016 मध्ये सुधारीत तंत्राने कलिंगडात पपईची लागवड केली. शेतक-यांना या पिकातून ब-यापैकी उत्पन्न मिळाले. मग 2017 मध्ये सुमारे पंधता शेतक-यांनी आच्छादनावर कलिंगडात पपईची लागवड केली. त्यांनाही चांगले उत्पादन मिळाले.
यंदाच्या हंगामात लोणी पंचक्रोशीतील चाळीस शेतक-यांनी कलिंगडात पपईची लागवड केली आहे. सध्याच्या काळात काही शेतक-यांनी कलिंगडाचे तोडे पूर्ण करुन त्यांचे वेल काढले आहेत. सध्या पपईचे पीक जोमात आहे. अरुण पाटील, चंद्रकांत पाटील, गोरक्षनाथ पाटील, लीलाधर पाटील, किशोर पाटील, नरेंद्र पाटील, गोपाळ पाटील, अभिमन पाटील, फत्तेसिंग चव्हाण, विकास पाटील, दगाजी पाटील, विलास पाटील, मुकेश पाटील, मंगल पाटील, सुरेश धनगर, नसरत शेख,. फजल शेख, शिवाजी देशमुख, नारायण पाटील आदी सेतक-यांनी यंदा कलिंगड व पपई असे आंतरपिक नियोजन केले आहे.
अवजार बॅंक व शास्त्रज्ञ संवाद :-
लोणी गावातील शेतक-यांनी अवजारे बॅंक तयार केल्याने योग्य दरात येग्य वेळी शेतीसाठी विवध अवजारांची उपलब्धता होते. येथील शेतक-यांनी गटशेतीवर भर दिला आहे. गटातील नरेंद्र पाटील यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदेत सदस्य म्हणून निवड झाली आहे. पाल येथील कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांचा नेहमीच मोलाचे लहकार्य व मार्गदर्शन मिळत असते. वर्षाभरापुर्वी केंद्राच्या माध्यमातून भुईमूग लागवडीत आच्छादनाचा वापर करत त्यांनी विक्रमी उत्पादन घेतले होते. याकरीता त्यांना प्रा. महेश महाजन ( विषय विशेषज्ञ – पीक संरक्षण ) यांचे मार्गदर्शन लाभले होते.
एकामेंका सहाय्य करु अवघे धरु सुंपथ :-
लोणी गावामध्ये कलिंगड, भाजीपाला, पपईची लागवड वाढल्याने शेतकरी आच्छादन, बियाणे, रोपे तयार करण्यासाठी आवश्यक ट्रे, खते, कीडनाशके निवडक कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून खरेदी करतात. त्यामुळे कमी दरात चांगल्या गुणवत्तेच्या निविष्ठा मिळतात. लोणी गावात कलिंगड, पपईची लागवड अधिक असल्याने व्यापारी थेट बांधावर फळांची करेदी करतात. अनेक शेतक-यांच्या बरोबरीने व्यापा-यांनी काही रक्कम देऊन पपई खरेदीचा करार केला आहे. गावात मुंबई, फैजपूर, चोपडा यासह मध्ये प्रदेशातील इंदूर, ब-हाणपूरचे व्यापारी कलिंगड, पपई खरेदीसाठी येतात.
असे आहे पीक नियोजन :-
डिसेंबर अखेरीस ट्रेमध्ये कलिंगड रोपांची निर्मिती.
गादीवाफा अडीच फूट रुंद आणि सव्वा फूट उंच, दोन गादीवाफ्यावरील लॅटरलमध्ये दहा फूट अंतर शेतक-यांना गावातील अवजार बॅंकेतून वाफा तयार करणा-याचे बैलजोडीचलीत रिजर आणि प्लॅस्टिक आच्छादनाला छिद्रे पाडण्याचे अवजार नाममात्र शुल्कावर भाड्याने मिळते. गादीवाफ्यामध्ये शिफारशीत मात्रेत शेणखत, निंबोळी पेंड, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळली जातात. गादीवाफ्यावर एक लॅटरल टाकून प्लॅस्टिक आच्छादन करुन छिद्रे पाडली जातात. 15 जानेवारीला गादीवाफ्यावर कलिंगड रोपांची दोन ओळीत सव्वा फूट, रोपात दीड फूट अंतराने लागवड. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत पपई रोपांची दहा फूट बाय सहा फूट अंतराने लागवड एक – एकरात पपईची सुमारे 800 रोपे तर कलिंगडाची साडेपाच हजार रोपांची लागवड. शिफारशीनुसार खत व्यवस्थापन, कीडनाशके, चिकट सापळ्यांचा वापर.
लागवडीनंतर 75 ते 85 व्या दिवसापासून कलिंगड तर पपईचे उत्पादन सातव्या महिन्यात सुरु सर्व शेतकरी आच्छाजनाचा वापर करतात. त्यामुळे तण नियंत्रण होते. पाणी कमी लागते. आच्छादनामुळे कलिंगडाचे तोडे 10 ते 15 दिवस लवकर सुरु झाल्यामुळे बाजारपेठेत चांगला दर.
कलिंगडाचे एकरी 20 टन उत्पादन, यंदा जागेवरच कलिंगडाला प्रति किलो पाच ते सहा रुपये दर, करार शेतीच्या माध्यमातून पपई प्रतिझाड 270 रुपये असा व्यापा-याकडून दर निश्चित. पपईच्या एका झाडाला 40 ते 60 किलो फळांचे उत्पादन. खर्च वजा जाता एकरी सरासरी दीड ते दोन लाखांचा निव्वळ नफा.