जैन इरिगेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : आधुनिक कृषीतंत्रज्ञानासाठी अनिल जैन यांचा ‘अमित कृषीऋषी पुरस्काराने गौरव’

कृषी तंत्रज्ञानावर विश्वास असलेल्या शेतकऱ्यांना पुरस्कार समर्पित : अनिल जैन

जैन इरिगेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : आधुनिक कृषीतंत्रज्ञानासाठी अनिल जैन यांचा ‘अमित कृषीऋषी पुरस्काराने गौरव’
- नवीदिल्ली येथील कार्यक्रमात जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांच्यावतीने डॉ. एच.पी. सिंग यांच्याहस्ते 'अमित कृषी ऋषी अवॉर्ड २०२५' स्वीकारताना डॉ. के.बी. पाटील, व्यासपीठावर डॉ. एस.एन. झा, डॉ. संजीव कुमार, डॉ. आलोक सिक्का, डॉ. ए.आर. पाठक आदी मान्यवर.

नवी दिल्ली/प्रतिनिधी :

आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे काम जैन इरिगेशनने करीत आहे. शेतीमध्ये आधुनिक उच्च कृषीतंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य या उद्योगातर्फे करण्यात येत आहे. याची दखल घेवून नवी दिल्ली येथील अमितसिंह मेमोरियल फाउंडेशनतर्फे जैन इरिगेशनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या उद्योग समूहाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांना 'अमित कृषी ऋषी अवॉर्ड २०२५'  या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. अमितसिंह मेमोरियल फाउंडेशनतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार आधुनिक शेतीतील नवोन्मेषी, ठिबक, तुषार सिंचन, टिश्युकल्चर या सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी दिला जातो. श्री जैन यांच्यावतीने हा पुरस्कार कंपनीचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी स्वीकारला.

पुरस्काराचे वितरण बिहार कृषी विद्यापीठाच्या राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेत करण्यात आले. पुरस्कार वितरण राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक, अभियांत्रिकी डॉ. एस. एन. झा,  भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शास्त्रज्ञ नियुक्ती मंडळाचे चेअरमन डॉ. संजय कुमार, अंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्थेचे प्रमुख डॉ. आलोक के. सिक्का, माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक उपस्थित होते. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 सहा दशकांची तपश्चर्या

जैन इरिगेशनने गेल्या सहा दशकांत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, टिश्यूकल्चर, प्रक्रिया केलेले अन्न व सौर ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. जैन इरिगेशनचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान भारतातच नव्हे तर आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये वापरले जात आहे. त्यामुळे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याची संधी मिळून लाखो शेतकरी आत्मनिर्भर झाले आहेत.

 पुरस्कार शेतकऱ्यांना समर्पित

हा पुरस्कार केवळ माझा नसून जैन इरिगेशनमध्ये काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, कंपनी आणि विकसीत नवतंत्रज्ञानवर विश्वास ठेवणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा आहे. हा पुरस्कार या सर्वांना समर्पित करतो. भारताच्या ग्रामीण भागात नवतंत्रज्ञान पोहोचवून शेतीला आधुनिक व जलयुक्त, शाश्वत करणे, हे उद्दिष्ट आहे.

 ---- अनिल जैन, उपाध्यक्ष , जैन इरिगेशन जळगाव