महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या नियामक मंडळाच्या संचालकपदी नेटाफिमचे कृष्णात महामुलकर : कृषी शिक्षण, संशोधानासह उद्योजकतेला मिळणार चालना

संचालकांच्या २० जागांसाठी निवडणूक बिनविरोध

महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या नियामक मंडळाच्या संचालकपदी नेटाफिमचे कृष्णात महामुलकर : कृषी शिक्षण, संशोधानासह उद्योजकतेला मिळणार चालना

 पुणे/प्रतिनिधी

राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन विस्तार, उद्योजकता व कृषी निर्यात क्षेत्रात ठोस कार्य करणाऱ्या महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेची वार्षिक साधारण सभा पुण्यातील महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेत संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाच्या संचालकपदी नेटाफिम कंपनीचे जनरल मॅनेजर कृष्णात महामुलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ व्यंकटराव मायंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी डॉ राजाराम देशमुख, डॉ उमाकांत दांगट, डॉ रामकृष्ण मुळे, सुदाम अडसूळ, अतुल मारणे आदी मान्यवरांसह सदस्य उपस्थित होते. सभेत कृषी पदवीधरांचे प्रश्न, कृषी शिक्षण व संशोधन, रोजगार व उद्योजकतेच्या संधी, जागतिक स्पर्धा, हवामान बदलाचे परिणाम, शाश्वत शेती तंत्रज्ञान, डिजिटल व कृत्रिम बुद्धीमत्ता ( एआय) आधारित उपाय योजनांवर चर्चा झाली. आगामी काळात शेतकऱ्यांना थेट उपयोगी ठरणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याचे धोरण आखण्यात आले. सभेनंतर २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी संस्थेच्या नियामक मंडळाची निवडणूक झाली. २० जागांसाठी २० अर्ज्र आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

यांची झाली संचालकपदी निवड

यामध्ये सदस्यपदी डॉ प्रशांत बोडके, डॉ सुदाम अडसूळ, डॉ किसान लवांडे, डॉ उमाकांत दांगट, सुनील बोरकर, अतुल मारणे, डॉ धर्मेंद्रकुमार फाळके, माधुरी घुगरी, डॉ रामकृष्ण मुळे, डॉ प्रकाश कडू, डॉ भगवान कापसे, डॉ मनीष कस्तुरे, कृष्णात महामुलकर, सुनील पवार, किशोर वीर, डॉ डी एम पंचभाई, जयवंत महल्ले, डॉ सुभाष जाधव, डॉ बाबासाहेब ठोंबरे, डॉ रणजीत चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के व्ही देशमुख व मच्छिंद्र घोलप यांनी काम पहिले. अध्यक्ष डॉ मायंदे यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

"नव्या कार्यकाळात संस्थेच्या माध्यामतून कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाताना ठोस व दूरदर्शी भूमिका घेण्यात येईल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डॉ मायदे यांनी यावेळी व्यक्त केला."