कृषी कायद्याला विरोध : रावेरला कृषी विक्रेत्यांतर्फे तीन दिवस बंद

रावेर तालुका ऍग्रो असोसिएशनच्या बैठकीत झाला निर्णय

कृषी कायद्याला विरोध : रावेरला कृषी विक्रेत्यांतर्फे तीन दिवस बंद

प्रतिनिधी / रावेर 

राज्य सरकारतर्फे लागू केल्या जाणाऱ्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ माफदा संघटनेने २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसाचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये रावेर तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी सहभागी होणार आहेत. याबाबत येथील कृषी उत्पन बाजार समितीच्या सभागृहात झाल्येल्या बैठीकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

२ ते ४ नोव्हेंबर तीन दिवस पुकारण्यात आलेल्या बंदवर चर्चा करण्यासाठी रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनची बैठक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  त्यात दिनांक २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान राज्यव्यापी कृषी विक्रेत्यांच्या बंदमध्ये सहभागी होऊन तालुक्यातील सर्व कृषी विक्रेत्यांची दुकाने तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भातील निवेदन तहसीलदार बंडू कापसे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंचायत समिती कृषी अधिकारी एल ए पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रावेर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे सचिव युवराज महाजन, उपाध्यक्ष एकनाथ महाजन, एकनाथ पाटील, सुनील पाटील, राहुल पाटील, चंद्रकांत अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश महाजन, डॉ जी एम बोंडे, विकास पाटील, श्रीपाद जंगले, स्वप्नील पाटील, प्रकाश चौधरी, चेतन महाजन, योगेश आस्वार, यांच्यासह तालुक्यातील १६० विक्रेते उपस्थित होते. 

"कृषी विक्रेत्यांचा हा बंद संपूर्ण राज्यभरात होणार असून या बंदमुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी १ नोव्हेंबरपर्यंत कृषी विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना सेवा दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी बंद लक्षात घेऊन त्यापूर्वी कृषी निविष्ठांची खरेदी कारवी व पुढील शेती कामांचे नियोजन करावे." 

---- सुनील कोंडे, अध्यक्ष- रावेर तालुका ऍग्रो डीलर असिसिएशन रावेर