भूमिपुत्रांचा गौरव : रावेरला ४ जानेवारीला राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार सन्मान सोहळा

विविध गटातून प्रस्ताव पाठविण्याची १५ नोव्हेंबर अंतिम मुदत

भूमिपुत्रांचा गौरव : रावेरला ४ जानेवारीला राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार सन्मान सोहळा

प्रतिनिधी/रावेर

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीहे ब्रीदवाक्य वाक्य घेवून साप्ताहिक कृषीसेवकचे गेल्या ११ वर्षापासून राज्यात कृषी विस्ताराचे कार्य अखंडितपणे सुरु आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात महाराष्ट्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते.

गेल्या सात वर्षात राज्यातील सुमारे ३०० व्यक्तींना आतापर्यंत माजी मंत्री श्री एकनाथराव खडसे, राज्य मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री पाशा पटेल, केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे, शेतकरी नेते व तत्कालीन राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री शंकरअण्णा धोंडगे, अग्री सर्च इंडिया प्रा लिमिटेड उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रदीप कोठावदे, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा जेष्ठ केळी तज्ञ श्री डॉ के बी पाटील,  महालक्ष्मी बायोजीनिक्सचे संचालक तथा उद्योजक श्री डॉ प्रशांत सरोदे, उद्योजक श्री श्रीराम पाटील, उद्योजक श्री युगंधर पवार, माजी खासदार श्री डॉ उल्हास पाटील,  माजी आमदार श्री अरुण पाटील, माजी आमदार श्री शिरीष चौधरी, तत्कालीन आमदार स्व. हरिभाऊ जावळे, तत्कालीन कृषी उपसंचालक श्री अनिल भोकरे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात स्वकर्तृत्वाने नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे अनेक भूमिपुत्र राज्यात आहेत. अशा प्रेरणादायी कृषी क्षेत्रातील व्यक्तींना ४ जानेवारी २०२६ रोजी रावेर ता रावेर जि जळगाव येथे राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदाचा हा ८ वा राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार वितरण सोहळा आहे. यासाठी राज्यभरातून शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी , कृषीशास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, कृषी मित्र, कृषी उद्योजक, कृषी लेखक व कृषी संस्था या गटातून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. निवड झालेल्या पुरस्कारारार्थींच्या कार्याचा आढावा व परिचय असलेया गौरव विशेषांकाचे प्रकाशन या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव १५ नोव्हेंबरपर्यंत krushisevak2014@gmail.com या ई-मेलवर किंवा 9404243515 या व्हाटसऑप नंबरवर पाठवावेत. (संपर्क कृष्णा पाटील, संपादक, साप्ताहिक कृषीसेवक मो 9404243515, 9011119504 )  

 

--