कृषी महोत्सव : जैनच्या इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे वाळवंटी भागात शेतीत क्रांती

गुजरात, राजस्थानच्या शेतकऱ्यांची कृषी महोत्सवाला भेट

कृषी महोत्सव : जैनच्या इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे वाळवंटी भागात शेतीत क्रांती

जळगाव/प्रतिनिधी

जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संजीवन दिनजन्मदिनानिमित्त आयोजित सायन्स-टेक@वर्ककृषी महोत्सवाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे ११ हजार शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट देऊन जैन इरिगेशनच्या उच्च कृषितंत्रज्ञानाची अनुभूती घेतली. गुजरातमधील १०० हून अधिक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनीही या महोत्सवात आपला सहभाग नोंदविला. कंपनीचे (गुजरात) सहकारी योगेश पटेल व अॅग्रोनॉमिस्ट चेतन गुळवे यांनी देखील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

गुजरात आणि राजस्थानच्या वालुकामय प्रदेशात पूर्वी फक्त जिरे, इसबगोल व मोहरीचे उत्पादन घेतले जात होते. तेथे आज डाळिंबाचे भरघोस उत्पादन होत आहे. ही क्रांती जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चर व ठिबक सिंचनासारख्या उच्च कृषीतंत्रज्ञानामुळे शक्य होऊ शकली असा विश्वासजैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा वरिष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी व्यक्त केले. जैन हिल्सवर सुरु असलेल्या कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्या गुजरातमधील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधला. २००४ मध्ये गुजरातच्या बनासकाठा जिल्ह्यातील डीसा येथे जैन इरिगेशनच्या टिश्युकल्चर डाळिंब लागवडीचा प्रथमच प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला मिळालेल्या यशामुळे सुरेंद्रनगर, हळवद, हिम्मतनगरसह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड सुरू झाली. देशातील सर्वोत्तम गुणवत्तेच्या डाळिंबाचे अनेक पटींनी उत्पादन वाढले आहे. आज या भागातील डाळिंब निर्यातही होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न एकरी ३०-४० हजार रुपयांवरून लाखो रुपयांपर्यंत पोहचले आहे. या ठिकाणीमोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जात असल्याने हा भाग समृद्ध झालेला आहे. खरे तर महाराष्ट्रात डाळिंबाचे उत्पादन होत होते, परंतु गुजरात व राजस्थानच्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने उत्पादनात त्यांनी आघाडी मिळविली आहे असेही डॉ. पाटील म्हणाले.

जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे बदल

राजस्थानातील झालावार, बाडमेर व जालोर जिल्ह्यातही डाळिंब शेतीने आर्थिक विकासाला नवे आयाम दिले आहे. वालुकामय भागातील पाण्याचा पीएच व इसी जास्त असूनही जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे डाळिंबासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. या प्रयोगांमुळे गुजरात व राजस्थानच्या वाळवंटी भागात शेतीत मोठी क्रांती घडली असून, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात जैन इरिगेशनच्या तंत्रज्ञानामुळे बदल झाला आहे.