चिनावलचे उद्योजक डॉ प्रशांत सरोदे यांचा उद्यम सह्याद्री पुरस्करराने गौरव : महालक्ष्मी बायोजिनिक्सच्या शिरपेचात मानाचा तुरा

छत्रपती संभाजीनगर येथे झाला सन्मान

चिनावलचे उद्योजक डॉ प्रशांत सरोदे यांचा उद्यम सह्याद्री पुरस्करराने गौरव : महालक्ष्मी बायोजिनिक्सच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रतिनिधी/ रावेर 

चिनावल (ता. रावेर) येथील महालक्ष्मी बायोजेनिक्सचे संचालक डॉ प्रशांत दिवाकर सरोदे यांचा छत्रपती संभाजीनगर येथे 'उद्यम सह्याद्री पुरस्कारा"ने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार डॉ प्रशांत सरोदे व त्यांचे बंधू भूपेंद्र सरोदे यांनी स्वीकारला. 

छत्रपती संभाजीनगर येथील उद्यम इन्फो सोल्युशन्स प्रा. लि. या उद्योगातर्फे २०२३ या आर्थिक वर्षात उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महालक्ष्मी बायोजेनिक्स गेली वीस वर्षे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे.

जमिनीची प्रत, त्यामध्ये कमी असणारी पोषणद्रव्ये यावर संशोधन करून त्याप्रमाणे जैविक खते व कीटकनाशके तयार करणे हे महालक्ष्मी बियोजेनिक्सचे वैशिष्ट आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उद्योजिका मोहिनी केळकर, लघु व मध्यम उद्योग विकास संस्थेचे संचालक एन एन इस्तोलकर, एमएएसएसआयए (MASSIA) महिला विभाग प्रमुख सुनीता राठी, उद्यम इन्फो सोल्यूशनस उद्योगाचे संचालक उल्हास भाले, सौ दीपा भाले उपस्थित होते.  कार्यक्रम समन्वयक तुषार जहागीरदार यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्यने उपस्थित होते. महालक्ष्मी बायोजिनिक्सचे संचालक व उद्योजक डॉ प्रशांत सरोदे व भूपेंद्र सरोदे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.