राज्य सरकारचे कृषी पुरस्कार जाहीर : तांदलवाडीच्या प्रशांत महाजन याना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

शेतीशी असलेल्या निष्ठेचे फळ : प्रशांत महाजन

राज्य सरकारचे कृषी पुरस्कार जाहीर : तांदलवाडीच्या प्रशांत महाजन याना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

प्रतिनिधी / रावेर

राज्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी व शेती संस्थांना दरवर्षी कृषी विभागातफे पुरस्कार दिले जातात. सन २०२०, २०२१ व २०२२ या वर्षातील पुरस्कार २३ फेब्रुवारीला राज्याच्या कृषी विभागाने जाहीर केले आहेत. यात तांदळवाडी (ता रावेर) येथील प्रगतिशील शेतकरी प्रशांत वसंत महाजन यांना २०२० या वर्षींचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. केळीचे गौणवत्तापूर्ण उत्पादन व निर्यात या क्षेत्रात श्री महाजन यांचे उल्लेखनीय काम आहे. त्यांना राज्य सरकारचा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

राज्यात कृषी व कृषी संलग्न तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डॉ पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार दिले जातात. सन २०२०, २०२१ व २०२२ या तीन वर्षातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  

"शेतीत अनेक प्रयोग राबवले त्यात काही यशस्वी झाले तर काही अयशस्वी ठरले. अयशस्वी प्रयोगामागील कारणांचा शोध घेऊ त्या दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. पिकांचे उत्पादन घेतांना शेतीशी एकरूप झालो, त्याच निष्ठेचे आज फळ मिळाले." 

---- प्रशांत महाजन, शेतकरी तांदलवाडी ता रावेर