शशांक पाटील व भास्कर पाटील यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर
मंगळवारी रावेरला होणार वितरण
रावेर / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या सेस योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या आदर्श शेतकरी पुरस्कारासाठी तांदलवाडी येथील प्रगतिशील शेतकरी व निसर्गराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शशांक मुकेश पाटील व खिर्डी येथील शेतकरी भास्कर वामन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सन२०२२-२३ व २०२३-२४ अंतर्गत देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी कृषी विकास अधिकारी यांच्या सूचनेवरून या दोघांची निवड करण्यात आली आहे. येत्या मंगळवारी २७ फेब्रुवारीला येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी दहा वाजता या दोघांना आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक -पुरस्कार शासनातर्फे प्रदान करण्यात येणार आहे.

krushisewak 
