शेतकऱ्यांना दिलासा : रावेर लोकसभा अंतर्गत सीसीआयचे ८ कापूस खरेदी केंद्र सुरु
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे प्रयत्न
प्रतिनिधी / रावेर
रावेर लोकसभा मतदार संघातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, शेंदुर्णी, भुसावळ, चोपडा, बोदवड, मलकापूर व नांदुरा येथे भारतीय कापूस महामंडळचे (सीसीआय) कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे मागणी केली होती. त्यानुसार भारतीय कापूस महामंडळमार्फत वरील ८ ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. संपूर्ण जळगांव जिल्ह्यात एकूण १५ कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
सीसीआयमार्फत एफएक्यू प्रतीच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रावेर लोकसभा मतदार संघातील १० ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालययाकडे मागणी करून याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार या ८ ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. बोदवड, जामनेर, भुसावळ येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून उर्वरित ठिकाणी लवकरच हे केंद्र सुरु होणार आहेत. याचा शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

krushisewak 
