जैन इरिगेशनतर्फे रावेरच्या तापी इरिगेशनचा सन्मान
टिश्यूकल्चर रोपांचा शेतकऱ्यांना केला सर्वाधिक पुरवठा
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
गेल्या वर्षात केळीच्या टिश्यूकल्चर रोपांची शेतकऱ्यांना सर्वाधिक विक्री व पुरवठा केल्याबाबदल येथील तापी इरिगेशनचे संचालक सोपान साहेबराव पाटील यांचा जैन इरिगेशनतर्फे सन्मान करण्यात आला.
खोपोली येथे जैन उद्योग समूहाच्या टिश्यूकल्चर वितरकांची बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्रातून सन २०२२-२३ या वर्षात सर्वाधिक ३२ लाख रोपांचा तापी इरिगेशच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आला आहे. उत्कृष्ट विक्री व सेवेबद्दल जैन इरिगेशनतर्फे विक्रेत्यांच्या या बैठकीत तापी इरिगेनशचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन, विपणन पमुख अभय जैन यांच्या हस्ते तापी इरिगेशनचे संचालक सोपान पाटील यांचे सुपुत्र प्रणव पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष (केळी तज्ज्ञ) के बी पाटील, उपाध्यक्ष (विपणन)एस एन पाटील, विपणन विभागाचे अधिकारी व वितरक मोठ्या संख्येने उपस्थित होते.