जैन इरिगेशनतर्फे रावेरच्या तापी इरिगेशनचा सन्मान

सर्वाधिक जैन टिश्यूकल्चर रोपांची केली विक्री

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

जैन इरिगेशन कंपनीचे वितरक व येथील तापी इरिगेशनचे संचालक सोपान पाटील यांनी गेल्या वर्षात जैन टिश्यूकल्चर रोपांची सर्वाधिक विक्री केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. पिपल्स बँकेचे संचालक व तापी इरिगेशनचे प्रमुख सोपान साहेबराव पाटील यांनी गेल्या वर्षी सुमारे ३२ लाख रोपांची शेतकऱ्यांना विक्री केली आहे. या वर्षातील हि सर्वाधिक विक्रीची जैन कंपनीत नोंद झाली आहे. खोपोली येथे आयोजित कार्यक्रमात तापी इरिगेशनचा सन्मान करण्यात आला. सोपान पाटील यांचे सुपुत्र व तापी इरिगेन्सचे संचालक प्रणव पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला.