सामाजिक दातृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह : ना पाटील

गौराई हॉलचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

सामाजिक दातृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह : ना पाटील
गौराई बहुउद्देशीय संस्था मंदिर व गौराई हॉलचे पुर्ननिर्माण केल्याबद्दल अशोक जैन यांचा सत्कार करताना पार्वती नगरमधील रहिवासी.

प्रतिनिधी/ जळगाव 

समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हॉलचे नूतनीकरण करून अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दात्वृत्वाने सेवा करणारा जैन उद्योग समूह आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शहरातील गिरणा पाण्याच्या टॉकीजवळील असलेल्या पार्वतीनगर येथील गौराई बहुउद्देशीय संस्था उद्घाटन व नुतनीकरण सोहळ्याचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, राजा मयूर, आमदार सुरेश भोळे, माजी नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, सौ. ज्योती जैन, जैन इरिगेशनचे सिस्टीमचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ अनिल ढाके, यांच्यासह पार्वतीनगरमधील रहिवाशी उपस्थित होते. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिव अनिल जोशी यांनी केले. सुत्रसंचालन जयदीप पाटील यांनी तर आभार डॉ अनिल ढाके यांनी मानले. 

अशोक जैन यांचा हृदय सत्कार

गौराई हॉलसह नुतनीकरण व मंदिर निर्माणासह अन्य सुविधा उपलब्ध केल्याबद्दल पार्वतीनगर वासियांतर्फे रामजन्मभुमी मंदिराची प्रतिकृती, शाल, श्रीफळ व सुतीहार देऊन अशोक जैन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.