चिनावलच्या महालक्ष्मी बायोजीनिक्सचे जैविक संशोधन पिकांचा दर्जा व उत्पादन वाढीसाठी पूरक : उद्योगाला भेट दिल्यावर आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केला विश्वास
शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र जैविक उत्पादन

प्रतिनिधी / रावेर
पिकांचा दर्जा, गुणवत्तापूर्ण उत्पादन व उत्पादनात वाढ व्हावी यासाठी चिनावल (ता रावेर) येथील महालक्ष्मी बायोजीनिक्स कार्य करीत आहे. या उद्योगाचे संचालक डॉ प्रशांत सरोदे यांचे जैविक संशोधनाचे काम पिकांच्या उत्पादनात वाढीसाठी महत्वपूर्ण आहे. डॉ सरोदे यांनी स्वत: संशोधन करीत निर्माण केलेली उत्पादने शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली असल्याचे मत आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केले. या उद्योगाला भेट देवून पाहणी केल्यावर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उद्योगातर्फे संचालक डॉ सरोदे यांनी आमदार जावळे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
शेतकऱ्यांच्या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी तसेच गुणवत्तेचे दर्जात्मक उत्पादनासाठी डॉ प्रशांत सरोदे चिनावल सारख्या ग्रामीण भागात गेल्या वीस वर्षापसून महालक्ष्मी बायोजीनिक्सच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. जैविक तंत्रज्ञानावर आधारित जैविक सेंद्रिय व सूक्ष्म अन्नद्रव्ये खत निर्मिती प्रकल्प व प्रयोग शाळेच्या माध्यमातून उच्च दर्जाची खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या या उद्योगाला आमदार अमोल जावळे यांनी सदिच्छा भेट दिली. तेथील संशोधनाची, जैविक खत निर्मिती प्रकल्पाची व अद्यावत प्रयोग शाळेची पाहणी करीत माहिती जाणून घेतली. फारसे मार्केटिंग नसलेल्या या कंपनीची खत उत्पादने मात्र शेतकऱ्यांच्या पसंतीस पडली असल्याचे आमदार जावळे यांनी यावेळी चर्चा करतांना सांगितले. स्वत: संशोधन करून गुणवत्तेची संशोधित उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असल्याबद्दल आमदार अमोल जावळे यांनी महालक्ष्मी बायोजीनिक्सचे संचालक डॉ प्रशांत सरोदे व त्यांचे बंधू भूपेंद्र सरोदे यांची प्रशंसा केली. यावेळी राजेंद्र पाटील, भास्कर सरोदे, कुंदन फेगडे, परेश महाजन, योगेश बोरोले, सुनील गाजरे, जयेश इंगळे, उमेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.