जिल्हाधिकाऱ्यांचा रावेर बाजार समितीला शब्द : केळी निर्यातीसाठी प्राथमिक सुविधांच्या निर्मितीवर : अपेक्षित भावासह कोल्ड स्टोरेजची होणार उभारणी
भावासंदर्भात बऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

प्रतिनिधी / रावेर
केळीचे भाव गेल्या काही दिवसापासून कमी होत आहेत. केळी उत्पादनासाठी मोठा खर्च होऊनही अपेक्षित भाव केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच केळी निर्यातीला चालना देण्यासाठी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी केळीच्या भावासह निर्यातीला चालना देण्यासाठी प्राथमिक सुविधांची उभारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. भावासंदर्भात येत्या तीन चार दिवसात बऱ्हाणपूर जिल्हाधिकाऱ्यांनी शी संवाद साधून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.