BREKING : तुझे फोटो तुझ्या पतीला दाखवेल अशी धमकी देत नात्यातील तरुणाचा विवाहितेवर लैंगिक अत्याचार : तरुणाला अटक : रावेर तालुक्यातील घटना

आरोपीला ३ दिवस पोलीस कोठडी

BREKING : तुझे फोटो तुझ्या पतीला दाखवेल अशी धमकी देत नात्यातील तरुणाचा विवाहितेवर लैंगिक अत्याचार : तरुणाला अटक : रावेर तालुक्यातील घटना

प्रतिनिधी/रावेर

तुझे फोटो तुझ्या पतीस व गावातील लोकांना दाखवून तुझी बदनामी करील अशी धमकी देवून नात्यातील एका तरुणाने विवाहितेशी शारीरिक संबध प्रस्थापित करून तिचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी या तरुणाविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयाने ३ दिवस २३ ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

रावेर तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय विवाहितेला त्याच गावातील नात्यातील एका तरुणाने तुझे फोटो तुझ्या नवऱ्याला व गावातील लोकांना दाखवून तुझी बदनामी करेल. तसेच तुला मारून टाकीन अशी धमकी देवून तिचा पाठलाग केला. विवाहितेच्या घराजवळील शेतात सदर पिडीतेस वेळोवेळी बोलावून विवाहितेची इच्छा नसताना बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबध ठेवून लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून सदर तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दखल करण्यात आला आहे. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक तुषार पाटील पुढील तपास करीत आहेत.