रावेरला होंडा शोरूममध्ये चोरी : 25000 रुपयांची रक्कम लंपास

शहरात भीतीचे वातावरण

रावेरला होंडा शोरूममध्ये चोरी : 25000 रुपयांची रक्कम लंपास

प्रतिनिधी /रावेर 

येथील सावदा रस्त्यावरील राम होंडा शोरूमच्या मागील बाजूची खिडकी शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. शोरूममधील कॅश काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली 25,000 रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यानी चोरून नेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी मध्यरात्री येथील सावदा रोडवरील राम होंडा शोरूमच्या मागील बाजूस असलेली स्लायडिंगची खिडकी तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला. शोरूमच्या कॅश काउंटर दोन्ही ड्रॉवरमधील कागदपत्रांची फेकाफेक करीत ड्रॉवरमध्ये ठेवलेले 25,000 रुपये चोरून नेले आहेत. होंडा शोरूमचे संचालक अमोल महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.