महाविकास आघाडीच्या उमेदवाराने समन्वय न राखल्यास वेगळे अस्तित्व निर्माण करू : शिवसेना (उबाठा) जिल्हा उप समन्वयक प्रल्हाद महाजन यांचा इशारा

रावेरला शिवसेनेची बैठक

महाविकास आघाडीच्या उमेदवाराने समन्वय न राखल्यास वेगळे अस्तित्व निर्माण करू : शिवसेना (उबाठा) जिल्हा उप समन्वयक प्रल्हाद महाजन यांचा इशारा

प्रतिनिधी / रावेर - 

येत्या विधनसभेत आपणच आघाडीचे उमेदवार असल्याचे समजून सकारात्मक भावनेने कार्यकर्त्यांनी काम करावे. तसेच आघाडीच्या उमेदवाराने सुद्धा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून समन्वय राखावा अन्यथा आम्हाला वेगळ्या पद्धतीने अस्तित्व निर्माण करावे लागेल असा इशारा जिल्हा उपसमन्वयक प्रल्हाद महाजन यांनी दिला आहे. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बैठकीत जिल्हा उपसंघटक पदी झालेल्या निवडीबद्दल अशोक शिंदे यांचा तर विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून रवींद्र पवार, तालुका प्रमुख पदी अविनाश पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील म्हणाले आपला पक्ष समाज कारणातून पुढे आलेला आहे त्यामुळे समाजकार्यात कार्यकर्त्यांनी पुढे राहिले पाहिजे. रावेर विधानसभा मतदार संघांचे आमदार आघाडीचे असून शिवसेना( उबाठा ) पक्षाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे ही खंत रवींद्र पवार यांनी व्यक्त केली. तालुका प्रमुखांनी आढावा घेतला. बैठकीत शहर प्रमुख राकेश घोरपडे, संतोष भावलाल , सुरेश शिंदे, तुषार निंबाळकर, कामिल शेख, मनोज वरणकर, निलेश महाजन , रविंद्र प्रजापती, आदिवासी तालुकाप्रमुख हुसेन तडवी उपस्थित होते.