रावेर पोलिसांची यशस्वी कामगिरी : सायबर क्राईमचा रावेरात फर्दाफास, सहा जणांना अटक

लॅपटॉप, मोबाईलसह लाखाच्यावर मुद्देमाल जप्त

रावेर पोलिसांची यशस्वी कामगिरी : सायबर क्राईमचा रावेरात फर्दाफास, सहा जणांना अटक

प्रतिनिधी / रावेर 

लॅपटॉप, मोबाईलचा वापर करून ऑनलाईन गेमचे ऍप्स तयार करीत त्याद्वारे लोकांना पैशांची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांचा मनसुभा रावेर पोलिसांनी उधळून लावला आहे. सायबर क्राईम घडण्यापूर्वीच पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी या घडणाऱ्या गुन्ह्याचा फर्दाफाश केला आहे. रावेर पोलिसांच्या या कारवाईचे जनतेतून स्वागत केले जात आहे. 

रावेर स्टेशन रोडवरील सुमननगर मधील दत्तू डिगंबर कोळी यांच्या राहत्या घरात काही व्यक्ती या मोबाईल व लॅपटॉप च्या साहाय्याने ऑनलाईन गेम ऍप्स तयार करून लोकांना आमिष दाखवून त्यावर हारजितचा गेम खेळण्यासाठी प्रोत्साहीत करून पैशांची गुंतवणूक करण्याचे प्रलोभन देत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार वरील ठिकाणी एपीआय अंकुश जाधव, पोलीस कर्मचारी राजेंद्र वंजारी, सुनिल वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, समाधान ठाकूर, संभाजी बिजागरे, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने धाड टाकली असता वरील प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अभिषेक अनिल बानिक (19 )रा मनीष नगर नागपूर, साहिल खान वकील खान (22) रा पन्हाना ता पन्हाना जि खांडवा, बालबीर रघुवीर सोळंकी (22) रा जावळ ता जि खांडवा, अंकित धर्मेंद्र चव्हाण (19) रा पन्हाना ता पन्हाना जि खांडवा, साहिद खान जाकीर खान (19) खडकवानी ता कासरावद जि खांडवा, गणेश संतोष कोसल (25) रा पन्हाना ता पन्हाना जि खांडवा हे सहा जण वेबसाईटवरून वेगवेगळ्या व्हाट्सअपवर लिंक टाकून लोकांना ऑनलाईन जुगार खेळण्याचे प्रोत्साहन देत होते. याप्रकरणी 9 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप, 2 मोबाईल चार्जर, एकटेंशन बोर्डअसा 1,15,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपिंना अटक करण्यात आली आहे.

सायबर क्राईम रोखण्यात पोलिसांना यश 

लिंकद्वारे मोबाईलवरून फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. पैशांचे आमिष दाखवून हा देखील फसवणूकीचा प्रकार होणार होता. मात्र रावेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेकांची फसवणूक टळली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.