रावेर तालुका खरेदीविक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलचा विजय
अपक्ष उमेदवार विजयी
रावेर / प्रतिनिधी
रावेर तालुका खरेदी विक्री संघाची आज (दि ११ फेब्रुवारी) एकूण १४ जागांसाठी निवडणूक झाली. माजी आमदार अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रल्हाद भागवत बोन्डे, रमेश डिगंबर पाटील, डॉ राजेंद्र नारायण पाटील, योगीराज गबाजी पाटील, यशवंत गणपत धनके, किशोर माणिक पाटील व सचिन रमेश पाटील यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या शेतकरी पॅनलचा विजय झाला .या निवडणुकीसाठी एकूण २० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम पाटील विजयी झाले आहे.
रावेर तालुक्यातील सहकार क्षेत्रातील मोठी संस्था म्हणून तालुका खरेदीविक्री संघाकडे पहिले जाते. सर्वसाधारण संस्था गटातून ४, सर्वसाधारण व्यक्तीशः गटातून ६, महिला राखीव मतदार संघातून २, इतर मागास प्रवर्गातून १, अनुसूचित जाती जमाती गटातून १, व विमुक्त भटक्या जाती व विमाप्र १ अशा एकूण १५ जगासाठी हि निवडणूक होत आहे. त्यापैकी विभजा गटातून १ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आलेली आहे. ११ फेब्रुवारीला एकूण १४ जगासाठी हि निवडणूक झाली. मतदानानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी करण्यात आली. अधिकारी म्हणून एफ आय तडवी यांनी काम पहिले. आय बी तडवी , बी व्ही पाटील डी व्ही धनगर यांनी सहकार्य केले.
विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते :
सर्वसाधारण व्यक्तिशः मतदार संघ :
जिजाबराव साहेबराव चौधरी(३३८), निलेश साहेबराब चौधरी(३४२), सीताराम मोतीराम महाजन(३२४), यशवंत शामराव महाजन(३३६), किशोर श्रावण पाटील(३४७), रमेश अण्णाजी पाटील(३४६), बाळू राजाराम शिरतुरे(२२ पराभूत), डी डी वाणी(६१ पराभूत)
सर्वसाधारण संस्था मतदार संघ :
लक्ष्मण बाबुराव मोपारी(४६), नितीन प्रकाश पाटील(३४), पुरुषोत्तम तुकाराम पाटील(३९), सुरेश माधवराव पाटील(४०), गणेश प्रल्हाद चौधरी (२१ पराभूत)
महिला राखीव मतदार संघ
नयना योगेश पाटील(४१८), उर्मिलाबाई चंद्रकांत पाटील(३९६) कल्पना उत्तमराव पाटील(२८ पराभूत ),
इतर मागासवर्गीय मतदार संघ
नीलकंठ नारायण चौधरी (३४९) , डी डी वाणी(७३ पराभूत)
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ
बिसन किसन सपकाळ (३७३), बाळू राजाराम शिरतुरे(४७ पराभूत)
"रावेर तालुक्यातील मतदारांनी व जनतेने शेतकरी पॅनलच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून विजयी केले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संघाच्या माध्यमातून काम केले जाईल. "
अरूण पाटील, माजी आमदार, रावेर