चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने बापाचा मृत्यू तर मुलगा जखमी

मुंजलवाडी-कुसुम्बा रस्त्यावरील घटना

चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने  बापाचा मृत्यू तर मुलगा जखमी

प्रतिनिधी / रावेर 

 चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याने पित्याचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी मुंजलवाडी-कुसुम्बा रस्त्यावर घडली. या घटनेत भदा मांगीलाल सोळंकी यांचा मृत्यू झाला आहे. 

खडकानदी ता झिरण्या येथील भदा सोळंकी व त्यांचा मुलगा चेतन हे दोघे बापलेक मोटारसायकलने मुंजलवाडीकडून कुसुम्बाकडे जात असतांना चालत्या मोटारसायकलवर अचानक झाड कोसळले. त्यात झाडाखाली दाबून भदा सोळंकी यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा या घटनेत जखमी झाला आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी रावेर पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेत घटनेची पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.