मराठा समाजभूषण स्व. डॉ जे जी पंडीत यांना जयंती दिनानिमित्त अभिवादन : स्व. डॉ पंडीत यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : डॉ एस आर पाटील
समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यावर चर्चा

प्रतिनिधी / रावेर
मराठा समाजभूषण, दानशूर व्यक्तिमत्व स्व डॉ जे जी पंडीत यांच्या ८९ व्या जयंती दिनानिमित्त रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळातर्फे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. मराठा समाजाला लाभलेले दानशूर,समाजसेवक असे व्यक्तिमत्व असलेल्या स्व डॉ पंडीत यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी होते असे मत मराठा समाज विकास मंडळाचे संचालक डॉ एस आर पाटील यांनी व्यक्त केले.
रावेर येथील समाजाच्या कै श्रीमती शेनाबाई गोंडू पंडीत मराठा समाज मंगल कार्यालयात समाजभूषण स्व डॉ जे जी पंडीत यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. स्व डॉ. पंडीत यांची कन्या सौ सुरेखा पाटील व जावई साहेबराव नामदेव पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी संचालक मंडळातर्फे अभिवादन करण्यात आले. दरम्यान स्व डॉ पंडीत यांच्या सामाजिक कार्याचे समाजाला कायम स्मरण राहावे यासाठी त्यांच्या नावाने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराने गौरव करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडीत, सचिव वामनराव पाटील, सहसचिव दिलीप पाटील, संचालक अंबादास महाजन, डॉ एस आर पाटील, डॉ मनोहर पाटील, कडू पाटील, आर बी महाजन, बी एस पाटील, एड विजय महाजन, युवराज महाजन, धनंजय महाजन, रवींद्र बखाल यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.