ब्रेकिंग: राज्यातील एसटी महामंडळाच्या १० डेपो मॅनेजरच्या बदल्या : रावेरचे डेपो मॅनेजर लाडवंजारी यांची छत्रपती संभाजीनगरला बदली
२९ नोव्हेंबरला बदल्यांचे आदेश
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील राज्यातील १० आगार व्यवस्थापकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगाव विभागातील रावेरचे आगार व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. जळगाव विभागातून बदली झालेले लाडवंजारी हे एकमेव आहेत. एसटी महामंडतीळ राज्यातील दहा डेपो मॅनेजरच्या बदल्या २९ नोव्हेंबरला करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचे आदेश एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चित्रे यांनी काढले.
बदली झालेले अधिकारी, सध्याचे ठिकाण व कंसात बदली झालेले ठिकाण पुढीलप्रमाणे :
स्वप्नील अहिरे- ठाणे -१ आगार ( आगार व्यवस्थापक ठाणे-१), अभिजित चौधरी- मनमाड आगार (आगार व्यवस्थापक तारकपूर,अहमदनगर), प्रवीण अंबुलकर - वरुड आगार (उपयंत्र अभियंता, अमरावती), सुनील भालतिडक- बुलडाणा (उपयंत्र अभियंता जळगाव),प्रशांत करवंदे- कळंब आगार (उप यंत्र अभियंता, धाराशिव), प्रीतम लाडवंजारी - रावेर आगार (उप अधीक्षक मध्यवर्ती कार्यशाळा छत्रपती संभाजीनगर ), भूषण सूर्यवंशी -स्वारगेट अगर (आगार व्यवस्थापक स्वारगेट ), अश्विनी किरगत-कवठे महाकाल (आगार व्यवस्थापक मिरज) ,संजय चव्हाण- शिराळा आगार (आगार व्यवस्थापक ,इचलकरंजी), उत्तम जुंदळे -सोलापूर आगार ( आगार व्यवस्थापक सोलापूर )