रसलपूर ग्रामपंचायत : सक्षम अधिकाऱ्यांकडून चौकशीची आमदार अमोल जावळे यांची मागणी
डेप्युटी सिईओंचे बिडीओंना चौकशीचे आदेश
प्रतिनिधी/रावेर
१५ व्या वित्त आयोगाच्या निधीत रसलपूर ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून याची सक्षम अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ बी. एस. अकलाडे यांनी रावेरचे बिडीओ विनोद मेढे यांना याप्रकरणाची सविस्तर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणार आहे.
रसलपूर ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यातआल्या आहेत. तसेच माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार अमोल जावळे, सामाजिक संघटना व नागरिकांनी या ग्रामपंचायतीची चौकशीची करून दोषी आढळणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी रावेर पंचायत समितीचे बीडीओ विनोद मेढे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे प्रकरण मिटवण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दरवाजे ठोठावण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न असफल ठरणार आहे.

krushisewak 
