महसूल सप्ताह समारोप : स्वतःला झोकून देत जनतेची कामे करावीत

रावेरला प्रांताधिकारी कैलास कडलग यांचे आवाहन

महसूल सप्ताह समारोप : स्वतःला झोकून देत जनतेची कामे करावीत

प्रतिनिधी / रावेर

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल सप्ताहात झोकून देत जनतेच्या कामांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा केला आहे. यामुळे जनता समाधानी असून कामाची ही पद्धत सर्वानी यापुढेही कायम ठेवावी असे आवाहन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले. महसूल सप्ताहाच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार बी ए कापसे, अप्पर तहसीलदार मयूर कळसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन डॉ दत्तप्रसाद दलाल, पद्माकर महाजन, रावेरच्या मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, सावद्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एम बी चौधरी, व्ही के तायडे, तालुका कृषी अधिकारी बी सी वाळके उपस्थित होते.  

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. वर्षभरात महसूल विभागाने राबविलेल्या जनतेच्या हिताच्या व लाभाच्या योजनांची तहसीलदार कापसे यांनी प्रास्तविकात माहिती दिली. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच लाभाचे मंजुरीचे प्रमाणपत्र यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अप्पर तहसीलदार मयूर कळसे व जे डी बंगाळे यांनी केले