आमदार सत्यजित तांबेनी भविष्यात राज्याचे नेतृत्व करावे
रावेरला सत्कार कार्यक्रमात आमदार शिरीष चौधरी यांचे मत
प्रतिनिधी / रावेर
राज्याचे नेतृत्व कारण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. विधानपरिषदेचे शिक्षक मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्यामध्ये राज्यातील जनतेच्या समस्या सोडवण्याची क्षमता आहे. त्यांनी भविष्यात राज्याचे नेतृत्व करावे असे मत आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले.
आमदार तांबे नाशिक पदवीधर मतदार संघातून विजयी झाल्यानंतर येथील रावेर शिक्षण संवर्धक संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते तांबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजना पाटील, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश धनके, माजी जि प सदस्य नंदकिशोर महाजन, डॉ केतकी पाटील, धनंजय चौधरी, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, चेअरमन डॉ दत्तप्रसाद दलाल, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बी ए कापसे, मयूर कळसे, दिलीप अग्रवाल, मानस कुलकर्णी, अशोक वाणी, मोरगावचे सरपंच जे आर पाटील, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सध्या राज्यात अनेक घडामोडी सुरु आहेत. राज्याचा विकास होण्यासाठी स्थिरता असायला हवी, यासाठी सक्षम नेतृत्व करण्याची गरज आहे. आमदार तांबे यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे, भाविषयात त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे असे आमदार चौधरी म्हणाले. तोच धागा पकडून माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनीही तरुणाईमध्ये नेतृत्व करण्यासाठी पुढे यावे आम्ही मार्गदर्शकाची भूमिका निभावू असे मनोगत व्यक्त करताना सांगितले. मी जरी शिक्षक आमदार असलो तरी सर्व समस्या सोडविण्याची माझी जबाबदारी आहे, आपले प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेल असे सत्काराला उत्तर देताना आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. यावेळी विष्णू भंगाळे व धनंजय चौधरी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा शैलेश राणे यांनी केले.
समाज कार्याची परंपरा कायम ठेवावी : अरुण पाटील
माजी आमदार सुधीर तांबे यांची जनतेची कामे करण्याची वेगळी सचोटी होती. त्यांच्या कुटूंबाला समाज कार्याची परंपरा आहे. सत्यजित तांबे यांनीकुटुंबाचा समाजकार्याचा वसा पुढे चालवावा. हि परंपरा कायम ठेवत जनतेचे प्रश्न सोडवावेत असे मत यावेळी माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केले.