दमदार-आमदार : आमदार अमोल जावळे यांची आक्रमकता अन प्रशासनात सुधारणा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सिव्हील सर्जन पाल ग्रामीण रुग्णालयात : कर्मचाऱ्याला बजावली शो कॉज नोटीस

सुधारणा प्रक्रियेला वेग

दमदार-आमदार : आमदार अमोल जावळे यांची आक्रमकता अन प्रशासनात सुधारणा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सिव्हील सर्जन पाल ग्रामीण रुग्णालयात : कर्मचाऱ्याला बजावली शो कॉज नोटीस

प्रतिनिधी | रावेर

 पाल (ता. रावेर) येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार अमोल जावळे यांनी बुधवारी अचानक भेटी दिल्यावर तेथील अस्वच्छता व कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा पाहून ते संतापले. त्यांनी तेथूनच जिल्हाधिकारी व सिव्हील सर्जन यांच्याशी बोलणी करीत येथे तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. याची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेत तातडीने सिव्हील सर्जन यांना याबाबतचे आदेश दिले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी आज  पालच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून पाहणी करीत सुधारणा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तर गैरहजर राहणाऱ्या स्वच्छता कर्मचारी चेतन चंदेल याला सिव्हील सर्जन डॉ पाटील यांनी शो कॉज नोटीस बाजवली आहे. आमदार अमोल जावळे यांची “दमदार-आमदार” अशी कार्यपद्धतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.   

रुग्णालयातील अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत आमदार जावळे यांनी आक्षेप घेतल्यानंतर रुग्णालयातील स्वच्छतेच्या अभावासाठी जबाबदार ठरलेला स्वच्छता कर्मचारी तेजस चंदेले याला नोटीस बजावण्यात आली आहे. या संदर्भात त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. रावेरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कळसकर यांच्याकडील रावेरचा पदभार काढून पाल रुग्णालयाची जबाबदारी सोपवली आहे. आमदार जावळे यांच्या सूचनेनुसार, रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा, रुग्णवाहिका सेवा आणि स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही या बाबतीत तातडीने उपाय योजनांचे आदेश दिले आहेत. पाल रुग्णालय हे सुमारे 23-25 आदिवासी गावांना सेवा पुरवते. त्यामुळे आदिवासी रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करण्याची योजना आखली जात आहे.

कर्मचाऱ्याला बजावली नोटीस 

"पाल ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. त्वरित स्वच्छता व कामात सुधारणा करण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रुग्णांना अत्यावशक सोयी सुविधा पुरवण्यासाठी अद्यावत उपकरणे बसविण्यात येणार आहेत. जबाबदर कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे."

--------डॉ किरण पाटील जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव

आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांची भेट

रावेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेची स्थिती पाहण्यासाठी व रुग्णांच्या दृष्टीने असलेली सोयी सुविधांची कमतरता समजून घेण्यासाठी पुढील आठवड्यात रावेर तालुक्यात येवून पाहणी करणार आहे.

------ आयुष प्रसाद जिल्हाधिकारी , जळगाव     

अन्यथा कठोर निर्णय घेवू

“रुग्णांना पुरेसी आरोग्य सेवा ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य विभागाने उपलब्ध करून दयावी. कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा आढळून आल्यास कठोर निर्णय घेण्यात येतील.

 -------अमोल जावळे आमदार रावेर