निंबोलचे राहुल पाटील रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष : नूतन कार्यकारिणी जाहीर

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

निंबोलचे राहुल पाटील रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष : नूतन कार्यकारिणी जाहीर

प्रतिनिधी/रावेर

रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी राहुल पाटील (निंबो) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांच्या अध्यक्षतेखाली रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत श्री कोंडे यांनी मागील पदाधिकारी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणीची निवड करण्याची सूचना मांडली.

यावेळी उपस्थितांमधून तालुकाध्यक्ष पदासाठी राहुल पाटील (निंबोल), उपाध्यक्ष -  जितेंद्र महाजन (रावेर), अमोल लोखंडे (चिनावल) , सचिव -प्रदीप महाजन (रावेर )सहसचिव- किरण महाजन (उटखेडा), खजिनदार- रवींद्र बारी (निंभोरा), तसेच कार्यकारिणी सदस्य  म्हणून  जयंत पाटील (सावदा), विवेक चौधरी (खिरोदा), चंदन चौधरी (अहिरवाडी), रुपेश महाजन (रसलपूर), वैभव चौधरी (मोरगाव), श्रीराम पाटील (केऱ्हाला), चेतन महाजन (अजनाड), संतोष पाटील (रावेर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली

यावेळी एस के अग्रवाल फर्मचे चंद्रकांत अग्रवाल, सुनील कुलकर्णी, जी एम बोंडे (खानपूर), महेश कृषी केंद्राचे संचालक एकनाथ महाजन, यशोधन अग्रो एजन्सीचे संचालक युवराज महाजन, अष्टविनायक कृषी केंद्राचे एकनाथ पाटील, किसान कृषी केंद्राचे मनोज भंगाळे , शोल्क अग्रो एजन्सीचे संचालक राहुल शिंदे, पंचायत समिती कृषी विस्तार एल ए पाटील, यांच्यासह तालुक्यातील कृषी केंद्रांचे संचालक उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्नायात आले.

"रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशन नेहमीच शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा वेळेवर व योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. तसेच संघटनेच्या माध्यमातून कृषी विक्रेत्यांचे प्रश्न , समस्या सोडविण्यासाठी नेहमीच संघटनेची निर्णायक भूमिका आजपर्यंत राहिली आहे."

---सुनील कोंडे , मावळते अध्यक्ष, अग्रो डीलर असोसिएशन रावेर तालुका

  "संघटनेने दिलेली जबाबदारी सर्वांना विश्वासात घेवून पार पाडली जाईल. कृषी विक्रेत्यांचे प्रश्न , समस्या वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून सोडवण्च्यायाचा प्रयत्न भावी काळात असणार आहे. याशिवाय समाजोपयोगी उपक्रम राबवित शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी अधिक घट्ट करण्यावर भर असेल."

राहूल पाटील, अध्यक्ष रावेर तालुका डीलर असोसिएशन रावेर