निवडणुक आखाडा रंगणार : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये

इच्छुकांची होणार भाऊगर्दी , राजकीय पक्ष देणार वेग

निवडणुक आखाडा रंगणार : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये

कृषीसेवक न्यूज नेटवर्क

राज्यातील मुदती संपलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याची तयारी निवडणूक  आयोगाने सुरु केली आहे. याबाबतचे राजपत्र निवडणूक आयोगाने ५ जुलैला जरी केले आहे. 

नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपून मोठा  कालावधी उलटला आहे. विकास कामे करताना यामुळे विकास कामे करताना अडचणी निर्माण होत होत्या. मात्र आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या निवडणूक घेण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. १ जुलै २०२३ या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे या निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे.