रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या चेअरमनपदी शितल पाटील यांची बिनविरोध निवड

फटाके फोडून कार्यकर्त्यांचा जल्लोष

रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या चेअरमनपदी शितल पाटील यांची बिनविरोध निवड

रावेर / प्रतिनिधी

रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर आज चेअरमन पदासाठी निवड करण्यात आली. या पदासाठी माजी नगराध्यक्ष शितल पाटील यांच्या नावावर संचालकांचे एकमत झाल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

चेअरमन पदाच्या निवडीसाठी संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष देवेंद्र मिसर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी शितल पाटील यांचे नाव संचालक तुषार मानकर यांनी सुचवले. उज्वल अग्रवाल यांनी त्यास अनुमोदन दिले. शितल पाटील यांच्या नावावर सर्व संचालकांचे एकमत झाल्याने या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष देवेंद्र मिसर यांनी जाहीर केले. या सभेला अध्यक्ष देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले, सचिव अक्षय अग्रवाल, डॉ दत्तप्रसाद दलाल, महेश अत्रे, शैलेंद्र देशमुख, संतोष अग्रवाल, तुषार मानकर, उज्ज्वल अग्रवाल, विजय लोहार उपस्थित होते. निवडीनंतर पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, ज्ञानेश्वर महाजन, तापी इरिगेशनचे संचालक सोपान पाटील, अनिल अग्रवाल, राजू सवर्णे, पंकज वाघ, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.