BREAKING : रावेर पंचायत समितीच्या गण आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड तर नवख्यांना मिळणार राजकीय प्रवेशाची संधी

रावेर तहसील कार्यालयात 12 गणांचे आरक्षण

BREAKING : रावेर पंचायत समितीच्या गण आरक्षणामुळे अनेकांचा हिरमोड तर नवख्यांना मिळणार राजकीय प्रवेशाची संधी

प्रतिनिधी/ रावेर

रावेर पंचायत समितीच्या 12 गणांच्या आरक्षण काढण्यासाठी तहसील कार्यालयात प्रांतधिकारी बबनराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार बी ए कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, आर डी पाटील, बिडीओ व्ही ए मेढे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे, भुषण कांबळे उपस्थित होते. यावेळी डॉ राजेंद्र पाटील सुनील कोंडे सी एस पाटील गणेश महाजन सोपान पाटील वाय व्ही पाटील संदीप पाटील यांच्यासह नागरीक व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. रावेर  तालुक्यातील पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे:

खिरवड- अनु जाती 

निंभोरा बुद्रुक-अनुसूचित जाती महिला

रसलपूर- अनुसूचित जमाती

खिरोदा प्र-या-अनुसूचित जमाती महिला

वाघोदा बु- सर्वसाधारण

थोरगव्हाण- सर्वसाधारण महिला

ऐनपूर-सर्वसाधारण महिला

तांदलवाडी-सर्वसाधारण

केऱ्हाळा बु -ना मा प्र महिला

विवरे बुद्रुक- सर्वसाधारण

वाघोड-ना मा प्र महिला

चिनावल-सर्वसाधारण