माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
रावेर तालुक्यात काँग्रेस होणार बळकट
प्रतिनिधी /रावेर
येथील माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे निष्ठावान पदाधिकारी हरीश गणवाणी व दारा मोहमद जफर मोहम्मद यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून पक्ष संघटनेला बळकट करण्याचे कार्य करण्यासाठी ही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे, युवा अध्यक्ष राहुल गांधी यांच्या देश हिताच्या चळवळीत सहभागी होऊन पक्ष बळकट करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल श्री गणवाणी बाबत यांचे सर्व स्तरातून तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.