प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : भाजपचे उमेदवार सोपान पाटील यांची हमी

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू

प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : भाजपचे उमेदवार सोपान पाटील यांची हमी

प्रतिनिधी/रावेर

उद्या (दि.२) डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी आज प्रचारतोफा तोफा थंडावणार आहे. रावेर नगरपालिकेच्या प्रभाग ११(ब) मधून भाजपचे उमेदवार सोपान साहेबराव पाटील यांनी प्रचार काळात थेट मतदारांच्या भेटी घेवून संपर्क केला आहे. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असून मतदारांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सहकार क्षेत्रात काम करीत असताना प्रत्येक घटकापर्यंत असलेला जनसंपर्क, सामाजिक कार्यात नेहमी असलेला पुढाकार, नागरिकांच्या सुखदुखात धावून जाऊन केली जाणारी मदत या कामाच्या बळावर मतदारांनी भाजपचे सोपान साहेबराव पाटील यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. प्रभागाचा नगरपालिका हद्दीच्या बाहेर असल्याने विकास झालेला नाही. त्यामुळे या भागाचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले. प्रत्येक घराला मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा, प्रभागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, आधुनिक सार्वजनिक स्वच्छता गृहे, दिवाबत्ती व स्मार्ट पथदिवे, युवकांसाठी क्रीडासुविधा, गरजूंसाठी सुरक्षित, दर्जेदार घरे, जेष्ठांसाठी मनोरंजन केंद्र व बगीचा, आरोग्य सुविधा , महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण, तक्रार निवारण कक्ष, यावर विशेष लक्ष दिले जाणार असून प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच संकल्प आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने नगरपालिकेला विकास कामासाठी मोठा निधी मिळण्याच्या आशा आहेत. त्यामुळे पक्षातर्फे या प्रभागाच्या विकासासाठी अधिकचा निधी मिळवता येणार आहे. एक वेळ सेवेची संधी द्या, प्रभागात प्राथमिक सर्व सुविधा पुरविण्यासह विकास कामे करून प्रभागाला आदर्श बनविण्याचा आपला निर्धार असल्याचे भाजपचे उमेदवार सोपान पाटील यांनी सांगितले.