BREAKING : रावेरच्या गटशिक्षणाधिकारी शिंदेचा पदभार काढण्याचा प्रस्ताव सिईओंकडे सादर : उद्या पदभार काढला जाण्याची शक्यता

शिंदेची विकेट पडल्यावर चांडाळ चौकडी रडारवर

BREAKING : रावेरच्या गटशिक्षणाधिकारी शिंदेचा पदभार काढण्याचा प्रस्ताव सिईओंकडे सादर  : उद्या पदभार काढला जाण्याची शक्यता

प्रतिनिधी/रावेर 

रावेरचे गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांनी शाळा तपासणीच्या नावाखाली तसेच शालेय पोषण आहाराबाबत कारवाई टाळण्यासाठी शिक्षकांकडून सक्तीची वसुली केल्याच्या शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. या प्रकरणाचा कृषिसेवक न्यूज नेटवर्कने भंडाफोड केल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. दरम्यान, शिंदे यांच्याकडील गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक अशा दोन्ही पदाचा पदभार काढण्यासाठी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामुळे उद्या मंगळवारी शिंदे यांच्याकडील या दोन्ही पदांचे पदभार काढले जाण्याची अधिक शक्यता आहे. दरम्यान, बिडीओ यांनी बजावलेल्या शोकॉज नोटीसला आज शिंदे यांनी खुलासा पंचायत समितीच्या टपाल विभागात संध्याकाळी चारनंतर सादर केल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाने दिली.

येथील गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांच्या कामकाजाबाबत तालुक्यातील शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. तसेच गुरुवारी कार्यालयाची वेळ सकाळी साडेनऊ वाजेची असतांना साडेअकरा वाजेपर्यंत कार्यालय कुलूपबंद होते. याची तक्रार आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिंदे यांना प्रशासकीय अकार्यक्षमता, कार्यालयात अनुपस्थित राहणे व नियोजनशून्य कारभाराबाबत शोकॉज नोटीस बजावली होती. दरम्यान, शिक्षकांना कारवाईचा धाक दाखवून त्यांच्याकडून शाळा तपासणीच्या तसेच शालेय पोषण आहाराबाबत कारवाई टाळण्यासाठी सक्तीची वसुली केली जात होती. याचे पुरावे अन्यायग्रस्त शिक्षकांनी कृषीसेवक न्यूज नेटवर्ककडे उपलब्ध करून दिले आहेत. या पुराव्याच्या आधारे शिक्षण विभागातील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आले आहे. 

उद्या पदभार काढण्याची शक्यता

दरम्यान, उद्याची पिढी घडविणाऱ्या व पवित्र क्षेत्र असलेल्या शिक्षण विभागाची प्रतिमा गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळे मलीन झाली आहे. शाळा तपासणीच्या नावाखाली शिक्षकांकडून सक्तीची वसुली तर शालेय पोषण आहाराबाबत कारवाईचा धाक दाखवून श्री शिंदे वसुली करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याची जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी दखल घेतली असून शिंदे यांच्याकडे असलेला गटशिक्षणाधिकारी पदासह शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा पदभार काढण्याचा प्रस्ताव आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्याकडे पाठवला आहे. उद्या मंगळवारी शिंदे यांच्याकडील या दोन्ही पदांचे पदभार काढले जाण्याची अधिक शक्यता आहे. 

नोटीसबाबत खुलासा सादर 

गुरुवारी बिडीओ विनोद मेढे यांनी गटशिक्षणाधिकारी शिंदे यांना शोकॉज नोटीस बजावून तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिंदे यांनी आज पंचायत समितीकडे लेखी खुलासा सादर केला आहे. हा खुलासा उद्या पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे पाठवला जाणार आहे.

शिंदेची विकेट : चांडाळ चौकडी रडारवर 

गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्या मनमानी कारभाराने त्रस्त झालेल्या शिक्षकांच्या तक्रारीची दखल घेत शिंदे यांच्याकडील गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक या दोन्ही पदांचा पदभार काढण्याची कार्यवाही आज सुरु करण्यात आली आहे. दोन दिवसात ही कार्यवाही पूर्ण होईल. वसुली प्रकरणी शिंदेची विकेट पडल्यानंतर त्यांचे हस्तक असलेले तीन केंद्रप्रमुख व एक पंटर अशी चांडाळ चौकडी चौकशीच्या रडारवर आहे. यांच्याबाबत असलेल्या तक्रारी व पुरावे नाशिक विभागाचे आयुक्त व जिल्हा परिषदेच्या सिइओ यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. सेवापुस्तक पडताळणीच्या नावाखाली वसुली करणाऱ्या "त्या" केंद्रप्रमुखाच्या कारनाम्याची चर्चा आहे. तर एका केंद्रप्रमुखाच्या सततच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून एका मुख्याध्यापिकेने व्हीआरएस घेतला आहे. या चांडाळ चौकडीची वरिष्ठ अधिकाऱ्यांतर्फे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.