मॅक्रो व्हिजन अकॅडमी रावेरची भुलाबाई महोत्सवात पुन्हा एक उंच झेप!

विद्यार्थिनींचा गौरव

मॅक्रो व्हिजन अकॅडमी रावेरची भुलाबाई महोत्सवात पुन्हा एक उंच झेप!

प्रतिनिधी / रावेर 

केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव संचलित ललित कला संवर्धिनी भुलाबाई महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. या जिल्हास्तरीय स्पर्धेतरावेरच्या मॅक्रो व्हिजन अकॅडमीच्या इयत्ता ५ वीच्या विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करत छोट्या गटात प्रथम पारितोषिक पटकावले. विजेत्या विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक व ₹५,००० रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामागे संगीत शिक्षक डिगंबर मुऱ्हाडकर, नृत्य शिक्षक रवि फुलमाळी आणि नृत्य शिक्षिका कारिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थिनींची सुरक्षितता व योग्य नियोजनाची जबाबदारी समन्वयक भारती चौधरी व प्रीती कुलकर्णी यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.विद्यार्थिनींच्या सादरीकरणामध्ये तालातील सुंदरता, नृत्यातील आकर्षक हालचाली, स्वतः विद्यार्थिनींनी तयार केलेले पारंपरिक भुलाबाईचे गीत आणि त्याला दिलेली पारंपरिक नृत्याची अप्रतिम जोड विशेष आकर्षण ठरली. आकर्षक व पारंपरिक वेशभूषा, कल्पकता, सुरेल गीत, तालबद्ध सादरीकरण आणि भुलाबाईच्या पारंपरिक लोककलेचे सुंदर दर्शन यामुळे परीक्षकांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. “पारंपरिक भुलाबाईचे गीत व नृत्य ही आपल्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब आहे. आपल्या परंपरा, इतिहास आणि लोकजीवनाचे दर्शन आपल्या विद्यार्थिनींनी या सादरीकरणातून प्रभावीपणे घडवून आणले,” अशा शब्दांत शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे व मुख्याध्यापक विजय जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील , सेक्रेटरी स्वप्नील पाटील , जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील आणि शाळेच्या शैक्षणिक संचालिका सौ. वनिता पाटील यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे कौतुक करून आनंद व्यक्त केला.तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे व खजिनदार विजय गोटीवाले यांनीही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. मॅक्रो व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी आपल्या अप्रतिम कलाविष्कारातून पुन्हा एकदा शाळेचा गौरव वाढवला आहे! पारंपरिक भुलाबाईचे गीत, त्यातील सांस्कृतिक भाव, तालबद्ध संगीत आणि पारंपरिक नृत्याची सुंदर सांगड या सादरीकरणातून आपल्या संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न विद्यार्थिनींनी केला आहे.