रावेर मतदार संघाच्या चौफेर विकासासाठी बांधील : काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांची ग्वाही
आदिवासी बांधवांकडून प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / रावेर
रावेर विधानसभा मतदार संघांचे संघ महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचार फेरीला आदिवासी बांधवानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी रावेर मतदार संघाच्या चौफेर विकासासाठी मी बांधील आहे अशी ग्वाही उमेदवार धनंजय चौधरी यांनी मतदारांशी संवाद साधतांना दिली.
रावेर तालुक्यातील गुलाबवाडी, मोहरव्हाल, ताडजिन्सी, विश्रामजिन्सी, आभोडा बु., आभोडा खु., या गावात उमेदवार धनंजय चौधरी यांची आज प्रचारफेरी होती. प्रचारफेरीत घराघरातून महिलांनी उमेदवाराचे औक्षण करीत आशीर्वाद दिले. यावेळी प्रत्येक गावाच्या विकासासाठी आपला प्रयत्न राहणार असून मतदारांचा आशीर्वाद मिळत असल्याचे भावनिक उद्गार धनंजय चौधरी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना व्यक्त केले. .
आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून जिन्सी ते रसलपूर 14 किलोमीटर डांबरीकरण रस्ता, जिन्सी सांबरपाट रस्ता पूल तसेच गावाअंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते, पेव्हर ब्लॉक अशी अनेक मुलभूत सुविधांची कामे झालेली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून चौधरी परिवाराने जाती-पातीविरहित सर्वसमावेशक राजकारण करत लोकसेवक मधुकरराव चौधरी व आमदार शिरीष चौधरी यांनी या मतदारसंघाचा चौफेर विकास केला. मात्र, गेल्या अडीच वर्षांत महायुतीच्या सरकारने अनेकविकासकामांना स्थगिती दिल्यामुळे मतदारसंघाच्या विकासात खंड पडला आहे. मतदारसंघाच्या विकासाला पुन्हा गतिमान करण्यासाठी निवडणुकीत माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून मतदानरुपी आशीर्वाद देण्याची ग्रामस्थांना विनंती केली.यावेळी लक्ष्मण पवार, गुलाब रामा गुरुजी, लखु मेंबर, नंदुलाल रोडू, गोकुळ राठोड, शंकर पवार, हंसराज बाजीराव, मोरव्हालचे सर्फराज तडवी, सरपंच जमीर तडवी, मोहम्मद तडवी, असलम तडवी, इस्माईल तडवी, कुर्बन तडवी, महमूद तडवी, गुलाब तडवी, इमरान तडवी, अकबर तडवी, इमरान तडवी, सुलेमान तडवी, फकिरा तडवी, छब्बिर तडवी, नथू तडवी, जयनुरबाई तडवी, जोहराबाई, सरपंच हसीना तडवी, ताडजिन्सी येथील शेख सलीम, युनूस तडवी, सरपंच सरफराज तडवी, हनिब पहिलवान, फत्तु परशुराम पवार, प्रताब राठोड, सचिन पवार, युनूस इस्माईल, रहीम अय्युब, सद्दल लुकमन, बलदार विश्राम जिन्सी उपसरपंच सौजी अभिराम पवार, छगन पवार, अमरसिंग पवार, अजमल पवार, अजमल जवाहरलाल पवार, उत्तम पवार, किशोर पवार, निलेश पवार, शुभाष पवार, उमराज पवार, सुनील पवार, करताल पवार, अभोडा सरपंच अल्लुद्दिन तडवी, गुळशर तडवी, मज्जीत तडवी, चांदखा तडवी, शेख आरिफ, इस्माईल पहेलवान, बशीर तडवी, सुलतान पठाण, हुसेन तडवी, सलीम तडवी, अशरद तडवी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.