जळगावला शेतकऱ्यांचा कुंभमेळा : जैन इरिगेशनतर्फे शेतकऱ्यासाठी शेतीचे जागतिक आधुनिक तंत्रज्ञानांचे दालन खुले
हायटेक शेतीचा नवा हुंकार : १४ डिसेंबरपासून कृषी महोत्सवाचे जळगावात आयोजन
प्रतिनिधी / जळगाव
आधुनिक हरितक्रांतीचे जनक असलेल्या पद्मश्री स्व भवरलाल जैन यांनी शेतीतील जागतिक आधुनिक तंत्रज्ञान जळगाव येथे आणून ते येथील मातीत विकसीत केले आहे. तळागाळातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचले पाहिजेव यातून त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन तो आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे ही स्व. जैन यांची भावना होती. शेतीच्या क्षेत्रातील जागतिक आधुनिक तंत्रज्ञान जैन इरीगेशनने जळगाव येथील जैन हिल्सवर उभे केले आहे. राज्यभरातील व राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहचून त्यांनी स्वताच्या शेतीत बदल करावा यासाठी जैन इरिगेशनचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता यावे यासाठी गेल्या वर्षापासून हायटेक शेतीचा नवा हुंकार हा कृषी महोत्सव खास शेतकऱ्यांसाठी राबविला जात आहे. शेतीतील पंढरीच्या विठ्ठलाने उभी केलेले हे तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल. या पंढरीत येत्या १४ डिसेंबर पासून महिनाभर चालणारा हा महोत्सव म्हणजेच शेतकरी भक्तांसाठी हा कुंभमेळाच म्हणावा लागेल. एक महिनाभर हा महोत्सव सर्वांसाठी खुला राहणार आहे.
शेतीला व्यावसायिक स्वरूप दिल्याशिवाय शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शक्य होणार नाही हे ओळखून पद्मश्री स्व भवरलाल जैन यांनी जैन इरिगेशनची स्थापना केली होती. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान स्व. जैन यांनी जैन इरिगेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. जगभरातील शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी जळगाव येथे आणून शेतकऱ्यांना प्रयोगाद्वारे शेतीतील तंत्रज्ञान दाखवण्यावर भर दिला. याचा लाभ राज्यातील व देशातील असंख्य शेतकऱ्यांना झाला आहे. शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर शेतीला आधुनिकतेची जोड देणे गरजेचे आहे. हे ओळखून विविध पिकातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी पाहता यावे यासाठी जैन इरिगेशनतर्फे हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. येत्या १४ डिसेंबरपासून या महोत्सवाला सुरुवात होत आहे. १४ जानेवारी २०२५ पर्यंत एक महिनाभर हा कृषी महोत्सव चालणार आहे. यात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीचे प्रयोग प्रत्यक्षात पाहण्याची संधी जैन इरिगेशनने या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या महोत्सवला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना शेती हि नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे साक्षात दर्शन या महोत्सवातून घडणार आहे. या कृषी महोत्सवात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होऊन आपल्या शेतीत बदल करीत आर्थिक प्रगती करावी. या महोत्सवात अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान पाहावे व आत्मसात करावे.