ब्रेकिंग : पोहणारा युवक सुकी नदीत बेपत्ता ; एसडीआरएफ टीमकडून शोध जारी
तहसीलदार घटनास्थळी थांबून
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
तालुक्यातील गारबर्डी धरण परिसरात सुकी नदी पात्रात पोहणारा युवक बेपत्ता झाला आहे. सकाळपासून एसडीआरएफची टीम धरण परिसरात नदी पात्रात त्याचा शोध घेत आहे.
तालुक्यातील रोझोदा येथील रवींद्र दगडू चौधरी हा त्याच्या चारपाच मित्रांसह शुक्रवारी गारबर्डी धरण परिसरात गेला होता. तेथे सुकी नदी पात्रात पोहत असताना रवींद्र चौधरी पुराच्या पाण्यात बेपत्ता झाला आहे. याची माहिती तहसीलदार बी ए कापसे यांना समजताच या ठिकाणी बेपत्ता झालेल्या युवकाच्या शोधासाठी एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. धरण परिसरात तहसीलदार कापसे स्वतः थांबून लक्ष ठेवून आहेत. एसडीआरएफ टीमकडून या युवकाचा शोध जारी असून अद्याप अद्याप तो मिळून आलेला नसल्याची माहिती आप्पती व्यवस्थापन समितीचे तालुकाध्यक्ष तथा तहसीलदार कापसे यांनी दिली आहे. दरम्यान रात्रीपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरु असून यामुळे नद्यानाल्यांना पूर आला आहे. नागरिकांनी पुराच्या पाण्यात वाहने टाकू नये अथवा उतरू नये असे आवाहन कापसे यांनी केले आहे.