आमदार अमोल जावळे यांची पाल ग्रामीण रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट : कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा व अस्वच्छतेची जिल्हाधिऱ्यांकडे तक्रार : सिव्हिल सर्जनला तात्काळ दखल घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पाल ग्रामीण रुग्णालयचा कारभार चव्हाट्यावर

आमदार अमोल जावळे यांची पाल ग्रामीण रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट : कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणा व अस्वच्छतेची जिल्हाधिऱ्यांकडे तक्रार : सिव्हिल सर्जनला तात्काळ दखल घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

प्रतिनिधी / रावेर 

पाल ता रावेर येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार अमोल जावळे यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयात केवळ दोन कर्मचाऱ्यांची उपस्थिती व तेथील अस्वच्छता व विदारक परिस्थिती पाहून श्री जावळे चांगलेच संतापले. त्यांनी ही बाब तात्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांच्याशी संपर्क साधून सांगितली आहे. आमदार अमोल जावळे यांनी यावेळी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आदिवासी रुग्णांची विचारपूस केली. आमदार जावळे यांनी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना योग्य त्या सुविधा पुरवण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत

आमदार अमोल जावळे आज पाल येथे गेले होते. त्यांनी पालच्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या ठिकाणी केवळ एक परिचारिका व एक स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर सर्व कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. पाल परिसरातील सुमारे 23 टे 25 आदिवासी गावांना येथून आरोग्य सेवा पुरवली जाते. मात्र अधिकारी व कर्मचारी येथे कायम उपस्थित राहत नसल्याने या भागातील रुग्णांना रावेर येथे उपचारासाठी यावे लागते. आदिवासी भागात आरोग्य सेवा पुरवणाऱ्या या शासकीय रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य आढळून आले. तर पुरुष, स्त्री रुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसून आली. औषधी उघड्यावर पडून होती. अमोल जावळे यांनी सुरुवातीपासून जनतेच्या हिताचा हा पवित्रा घेतल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी व सिव्हिल सर्जनशी संपर्क 

आमदार जावळे यांनी ग्रामीण रुग्णालयातील आखो देखा हाल तात्काक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व सिव्हिल सर्जन डॉ किरण पाटील यांच्याशी संपर्क साधून सांगितला आहे. तसेच गैरहजर कर्मचारी व अस्वच्छता बाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

रुग्णांची अस्थेवाईकपणे विचारपूस 

उपचारासाठी आदिवासी रुग्ण दाखल होते. त्यांची आमदार जावळे यांनी उपचाराबाबत अस्थेवाईकपणे विचारपूस केली. तसेच काही मदत पाहिजे असल्यास माझ्याशी संपर्क करा असा दिलासा दिला. 

सिव्हिल सर्जन उद्या पालला 

आमदार अमोल जावळे यांनी पालच्या ग्रामीण रुग्णालयातील समस्यांचा पाढा जिल्हाधिकारी यांच्याकडे वाचल्यावर याची तात्काळ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दखल घेतली आहे. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांना उद्या तातडीने पाल ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन योग्य त्या सुविधा व स्वच्छता करण्याचे आदेश दिले आहेत.

"शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये आदिवासी व रुग्णसेवेसाठी खर्च होत असतांना अधिकारी व कर्मचारी बेफिकीरपणे वागत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. या रुग्णालयात तात्काळ स्वच्छता व सोयीसुविधा पुरवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत "

अमोल जावळे आमदार रावेर