रावेर निवडणूक : प्रभागाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास : भाजपच्या उमेदवार सीमा जमादार यांची हमी
ठिकठिकाणी औक्षण, जेष्ठांचे आशीर्वाद
प्रतिनिधी/रावेर
वातावरणात गारठा वाढत असतानाच नगरपालिका निवडणुकीने वातावरण गरम झाले आहे. रावेर नगरपालिका निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. प्रभाग क्र.११(अ) मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार सीमा आरिफ जमादार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दररोज नियोजनबद्ध प्रचार फेरीमुळे त्यांनी थेट मतदारांशी संपर्क केला आहे. प्रचार करतांना अनेक ठिकाणी महिलांकडून त्यांचे औक्षण केले जात आहे. तर जेष्ठांचे त्यांना आशीर्वाद मिळत आहेत. त्यामुळे या प्रभागातून भाजपला मोठे मताधिक्य मिळून भाजपचे नगराध्यक्षासह प्रभागातील तिन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

krushisewak 
