रावेर निवडणूक : प्रभागाचा सर्वांगीण विकास : अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांचा निर्धार

मतदारांचा उत्स्फूर्त पाठींबा

रावेर निवडणूक : प्रभागाचा सर्वांगीण विकास : अपक्ष उमेदवार प्रमिला पाटील यांचा निर्धार

प्रतिनिधी/रावेर

रावेर नगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसावर आली आहे. प्रचार शिगेला पोहचला असून प्रभाग क्र.१२(अ) मधील अपक्ष उमेदवार प्रमिला चुडामण पाटील यांनी प्रभागातील प्रत्येक मतदारांच्या भेटी घेऊन विश्वास संपादन केला आहे. त्यांना मतदारांचा उत्स्फुर्तपणे पाठींबा मिळत असून या प्रभागातून त्यांचा विजय निश्चित मनाला जात आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आपला निर्धार असल्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे.

नगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला भावी काळात भर राहणार आहे. दर महिन्याला या प्रभागात “संपर्क दरबार” हा अभिनव उपक्रम राबवून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या जातील. सर्वांना विश्वासात घेवून प्रभागात करण्यात येणाऱ्या विकास कामाबाबत चर्चा करण्यात येईल. प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, भुयारी गटारी, सोलरवरील स्ट्रीटलाईट, महिलासाठी संवाद सभागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण, यावर विशेष भर दिला जाणार आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी भविष्यात अधिकाधिक निधी मिळवून प्रभागाला सुंदर स्वच्छ व आदर्श बनविण्याचा आपण निर्धार केला असल्याचे आश्वासन अपक्ष उमेदवार प्रमिला चुडामण पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे मतदारांचा त्यांना उत्स्फुर्तपणे पाठींबा मिळत असून त्यामुळे प्रमिला पाटील यांचा विजय निश्चित मनाला जात आहे.