या कारणावरून पत्नीचा गळा आवळून खून : आरोपी पतीस अटक
रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक येथील घटना

प्रतिनिधी/ रावेर
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना रावेर तालुक्यातील अभोडा बुद्रुक येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. आशाबाई संतोष तायडे वय 38 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
अभोडा बुद्रुक येथील संतोष शामराव तायडे हा पत्नी आशाबाई सोबत राहत होता. आशाबाई रात्री एका व्यक्तीसोबत बोलत होती. याबाबत संतोष तायडे याने पत्नी आशाबाईला कोणासोबत बोलत होती असे विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतोषला याचा राग आला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना आज सकाळी अभोडा बुद्रुक येथे घडली. घटना घडल्यावर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना दिली. तात्काळ घटनास्थळी डी वाय एस पी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल, उप निरीक्षक तुषार पाटील हजर झाले. मृतदेहाचे शव विच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. आरोपी पती संतोष शामराव तायडे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.