कायम तुमच्यासोबत राहून जनतेची मिळालेली साथ नक्कीच सार्थ ठरवेल : महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांचे आश्वासन

रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

कायम तुमच्यासोबत राहून जनतेची मिळालेली साथ नक्कीच सार्थ ठरवेल :  महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांचे आश्वासन

प्रतिनिधी / रावेर 

जनतेत महायुतीविरुद्ध वातावरण तापले असून वीस तारखेपर्यंत हेच वातावरण ठेवा आणि महायुतीच्या या सरकारला सत्तेतून बाहेर टाका. आज जनतेने महाविकास आघाडी मधील सगळ्या नेते मंडळींनी पदाधिकाऱ्यांनी तरुण कार्यकर्ते यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया दिली. 

येथील आठवडे बाजार मैदानावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, आ.शिरीष चौधरी, बऱ्हाणपूरचे माजी आमदार सुरेन्द्रसिंग ठाकूर(शेरा भैय्या), ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रल्हाद महाजन, माजी आमदार रमेश चौधरी हाजी छब्बीर शेठ, श्रीराम पाटील, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे ,मुक्ती हारून नदवी , एजाज मलिक, लिलाधर चौधरी , राजू तडवी ,डॉ राजेंद्र पाटील, प्रभाकर सोनवणे , मुकेश येवले , किशोर पाटील, सोपान पाटील, विलास तायडे ,शेखर पाटील,यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

रावेर विधानसभा क्षेत्र निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धनंजय चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला . या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीत सहभागी होऊन जनसामान्यांनी दिलेले आशीर्वाद हे उद्याच्या विजयाची नांदी आहेत.जाहीर सभेमध्ये बोलताना अनेक नेत्यांनी आपल्या कणखर शब्दात महायुतीवर हल्लाबोल केला. प्रसंगी धनंजय चौधरी बोलताना सांगितले की, या जनसागराचा आणि लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मला प्रत्यय आला. यावेळी नागरिकांची तुफान गर्दी मी अनुभवली. मी त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही या निमित्ताने ग्वाही देतो. या मतदारसंघातील विकासाकरता मी कायम कटिबद्ध राहील. तुमच्या सर्वांच्या साथीने रावेर यावल विधानसभा क्षेत्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे देखील मत व्यक्त केले.