कृषीसेवकतर्फे १२ जानेवारीला 7 वा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा : रावेरला होणार कृषी क्षेत्रातील भूमिपुत्रांचा होणार सन्मान

१० डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याची मुदत

कृषीसेवकतर्फे १२ जानेवारीला 7 वा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा : रावेरला होणार कृषी क्षेत्रातील भूमिपुत्रांचा होणार सन्मान

प्रतिनिधी / रावेर 

 शेती व शेतीशी संबधीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व समाजासाठी प्रेरक ठरणाऱ्या राज्यातील भूमिपुत्रांना दरवर्षी साप्ताहिक कृषिसेवकतर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने* गौरविण्यात येते. यंदाचे पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रावेर ता. रावेर जि. जळगाव येथे १२ जानेवारी २०२५  रोजी करण्यात येणार आहे.

शेतीत व शेतीशी निगडित क्षेत्रात काम करताना स्वतःच्या कौशल्याने प्रगती करीत इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या व्यक्तींचा कृषिसेवकतर्फे  वर्धापनदिनाचे औचित्य साधून  दरवर्षी सन्मान करण्याची परंपरा आहे. आदर्श शेतकरी, आदर्श महीला शेतकरी, आदर्श युवा शेतकरी, आदर्श कृषी शास्त्रज्ञ, आदर्श कृषी तज्ञ, आदर्श कृषी उद्योजक, आदर्श कृषी मित्र, आदर्श कृषी विज्ञान केंद्र, आदर्श कृषी विज्ञान मंडळ/ आदर्श फार्मर प्रोड्यूसर कंपनी/आदर्श शेतकरी गट या गटातून पुरस्कार दिले जाणार आहेत. निवड झालेल्या पुरस्कारार्थिंच्या कार्याचा आढावा असलेला विशेषांक यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे. यासाठी विविध गटातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव १० डिसेंबर  २०२४ पर्यंत खालील ईमेलवर अथवा व्हॉट्स अप क्रमांकावर पाठवावेत. संपर्क-- 9404243515 email -krushisevak2014@gmail.com