केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा : जिल्ह्यातील ५० महसूल मंडळ पीक विम्यासाठी पात्र
खासदार रक्षा खडसे यांची माहिती
प्रतिनिधी / रावेर
मे महिन्यात १० ते १५ तारखे दरम्यान सलग ५ दिवस जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील ५० महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी फळ पिक विम्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.
*प्रति हेक्टर मिळणार रु.४३,५००/- लाभ*
पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” मधील केळी पिकाच्या अनुषंगाने, महावेध माहिती (डेटा) नुसार असे लक्षात आले आहे की चालू महिन्यात दि.१० ते १५ मे २०२३ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ५० महसूल मंडळात सलग ५ दिवस तापमान ४५ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला जास्त तापमानाचा फटका बसला आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४३,५०० रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई मंजुर होणार आहे. तसेच या पूर्वी जानेवारी महिन्यात सलग ३ दिवस कमी तापमानामुळे प्रति हेक्टर २६,५०० रुपयांप्रमाणे (कमी व जास्त तापमान मुळे झालेल्या नुकसान भरपाईचे मंजुर) मंजूर झाले होते अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
१० ते १५ मे २०२३ दरम्यान जास्त तापमानमुळे झालेल्या नुकसान भरपाईस पात्र जळगांव जिह्यातील तालुकानिहाय महसूल मंडळे खालील प्रमाणे:
_*रावेर लोकसभा क्षेत्र*_
*रावेर* : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदा, निंभोरा बू., रावेर, सावदा.
*चोपडा* : अडावद, लासूर, धानोरा प्र., चोपडा, गोरगावले, हातेड बु. चाहार्डी.
*मुक्ताईनगर* : घोडसगाव, अंतूर्ली, कुऱ्हे, मुक्ताईनगर.
*यावल* : भालोद, साकाळी, किनगाव बू., बामणोद, यावल, फैजपूर.
*भुसावळ* : वरणगाव, पिंपळगाव खु., भुसावळ.
_*जळगांव लोकसभा क्षेत्र*_
*जळगाव* : पिंप्राळा, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद, नशिराबाद.
*अमळनेर* : अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, शिरुड, वावडे.
*चाळीसगाव* : शिरसगांव.
*धरणगाव* : धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद.
*एरंडोल* : एरंडोल, रिंगनगांव.
*पारोळा* : तामसवाडी.
*भडगाव* : भडगाव.