वचनपूर्ती विकासाची : आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते ४५ लाखांच्या कामांचे लोकार्पण

आदिवासी भागातील नागरिकांनी मानले आमदारांचे आभार

वचनपूर्ती विकासाची : आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते ४५ लाखांच्या  कामांचे लोकार्पण
विद्युत ट्रानसफॉर्मर चे लोकार्पण करताना आमदार शिरीष चौधरी व पदाधिकारी,ग्रामस्थ

प्रतिनिधी / रावेर

आमदार शिरीष चौधरी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच विविध विकास कामांच्या निधी अंतर्गत एकूण ४५ लक्ष रुपयांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. 

मतदारसंघातील आदिवासी भागात रस्ते काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, गावांतर्गत रस्ता डांबरीकरण ही कामे पूर्ण झाल्याने दीर्घ काळापासूनची समस्या सुटली असे ग्रामस्थांनी सांगितले. यानिधी अंतर्गत रावेर तालुक्यातील गारबर्डी येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे - ९ लक्ष, सहस्त्रलिंग येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण - ४ लक्ष, लालमाती येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे - ५ लक्ष, पाल येथे गावांतर्गत रस्ता डांबरीकरण - १८ लक्ष, पाल येथे वन विभागाचे अनुपम रेस्ट हाउस दुरूस्तीकरण - ९.५ लक्ष या विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आदिवासी गावातील विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांचे आभार मानले. याप्रसंगी काँग्रसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, मुंजलवाडी सरपंच योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, कुसुंबा येथील सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच मुकेश पाटील, निमड्या -गारबर्डी-गारखेडा सरपंच रतन बारेला, उपसरपंच नांदाभाया बारेला, सहस्त्रलिंग सरपंच अरमान तडवी, उपसरपंच करीम तडवी, आभोडा माजी सरपंच गुलशेर तडवी, राजू पावरा, सुरमीबाई बारेला, नवलशिंग बारेला, बारशिंग बारेला, महावीर भिलाला, येहेत्या भिमशिंग बारेला, लालमाती गणेश पवार, राधेश्याम पवार, प्रेम राठोड, ग्रामपंचायत सदस्य रुपाली धनगर, प्रेमचंद धनगर, राजू तडवी, पांडुरंग चव्हाण, फत्तु पवार, अनिल पवार, मुकेश चव्हाण, दिनेश पवार, पालचे कामिल तडवी, देविदास हडपे, महेबूब तडवी, रौनक तडवी, सलीम तडवी, पिंटू पवार, सेवा गोकुळ चव्हाण, बबलू तडवी, सलदार तडवी, याकूब तडवी, जावेद तडवी, अमीन तडवी, अनारशिंग चव्हाण, उत्तम चव्हाण, करणशिंग जाधव, गणेश भोई, महेमूद तडवी, सहस्त्रलिंग येथील सुलेमान तडवी, रमजान तडवी, गफ्फार तडवी, रुबाब तडवी, कुर्बान तडवी, मुस्तुफा तडवी, पिंप्री येथील काशिनाथ निकम, सावन मेंढे, धुमा तायडे, रामदास लहासे, भूपेस जाधव, राहुल महाजन, मेहबुब जमादार आदी उपस्थित होते.