केळीच्या समस्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज रावेरला बैठक
नागरिकांच्या जिल्हाधिकारी घेणार भेटी
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर
केळीला मिळणारा भाव व या पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीत केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेवून ते मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल स्वतः प्रयत्नशील आहेत. या बैठकीनंतर तालुक्यातील नागरिकांच्या भेटी ,समस्या ,तक्रारी व निवेदने दुपारी साडे बारा वाजता जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात स्वीकारणार आहेत. तर तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी तालुका स्तरावरील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक दुपारी दोन वाजता होणार आहे अशी माहिती तहसिलदार बंडू कापसे यांनी दिली आहे.