रावेरला प्रभाग 11 मध्ये तिरंगी लढत : अपक्ष उमेदवारमुळे होणाऱ्या मत विभाजनाचा फटका कोणाला बसणार?

भाजपचे सोपान पाटील यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

रावेरला प्रभाग 11 मध्ये तिरंगी लढत : अपक्ष उमेदवारमुळे होणाऱ्या मत विभाजनाचा फटका कोणाला बसणार?

प्रतिनिधी/ रावेर 

रावेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा आखाडा आता तापायला लागला आहे. प्रभाग क्र 11 मधील लढतीकडे संपूर्ण रावेर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रभागातून रावेर पीपल्स बँकेचे माजी चेअरमन सोपान साहेबराव पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे गणेश सोपान पाटील व अपक्ष उमेदवार सुनील सोपान महाजन यांच्यात तिरंगी लढत होत आहे. सुनील महाजन यांच्यामुळे होणाऱ्या मत विभाजनाचा फटका कोणाला बसू शकतो हे विजयानंतर दिसून येणार आहे. मात्र या प्रभागातील मतदारांचा भाजपचे उमेदवार सोपान साहेबराव पाटील यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.

प्रभाग 11 मधील बहुतांशी भाग हा पूर्वी नगरपालिका हद्दीच्या बाहेर होता. तीन वर्षांपूर्वी हद्दवाढ झाल्याने या भागाचा समावेश पालिका कार्यक्षेत्रात झाला आहे. हद्दवाढीनंतर याभागासाठी होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या प्रभागातून सर्वसाधारण जागेतून सोपान साहेबराव पाटील यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. तर गणेश सोपान पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निवडणूक लढवत आहेत.  सुनील सोपान महाजन, जगन्नाथ शिवलकर, हरीश जगताप, ज्ञानेश्वर वाणी हे सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

खरी लढत भाजप-राष्ट्रवादीत 

या प्रभागातील खरी लढत भाजपचे सोपान साहेबराव पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश सोपान पाटील यांच्यात होणार आहे. मात्र असे असले तरी सुनील सोपान महाजन यांना मिळणारी मते निर्णायक ठरण्याची शक्यता मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. भाजपचे उमेदवार सोपान पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांचा प्रभागातील जनतेशी असलेला जनसंपर्क, प्रभागाच्या विकासाचे असलेले व्हिजन व प्रभागातील समस्यांची असलेली जाण यामुळे त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. हे तिन्ही उमेदवार मराठा समाजाचे असून यामुळे मराठा मतदारांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा फटका नेमका कोणाला बसतो हे लवकरच दिसून येईल. रावेर विधानसभा मतदार संघांचे आमदार भाजपचे अमोल जावळे आहेत. त्यामुळे प्रभागाच्या विकासासाठी त्यांच्या माध्यमातून भविष्यात निधी उपलब्ध होऊ शकतो. तर अपक्ष असलेले उमेदवार किती मते घेतात यावर जयपराजयाची गणिते अवलंबून आहेत