रावेरला माघारीच्या दिवशी राजकीय घडामोडी : भाजप व महाविकास आघाडीत सरळ लढत : काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची माघार

नगराध्यक्षासाठी 6 तर नगरसेवकसाठी 97 उमेदवार रिंगणात

रावेरला माघारीच्या दिवशी राजकीय घडामोडी : भाजप व महाविकास आघाडीत सरळ लढत : काँग्रेस व  राष्ट्रवादीच्या उमेदवारांची माघार

प्रतिनिधी / रावेर 

नगरपालिका निवडणुकीच्या आज माघारीच्या दिवशी वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेस (आय) व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांसह तब्बल 9 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे सुरुवातीला चौरंगी वाटणारी लढत आता महाविकास आघाडीच्या शिवसेना(उबाठा) मित्र पक्षाच्या उमेदवार मनीषा रवींद्र पवार व भाजप-शिंदेसेना महायुतीच्या उमेदवार संगीता भास्कर महाजन यांच्यात सरळ लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी आता संगीता भास्कर महाजन भाजप, मनीषा रवींद्र पवार उबाठा, शेख नाजियाबी शेख वसीम एम आय एम,अपक्ष उमेदवार ललिता दिलीप कांबळे, खान रेहाना बी असदुल्ला, व काजी सजेदा बी सदरोद्दीन या 6 महिला उमेदवार रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार शबानाबी आसिफ मोहम्मद व काँग्रेसच्या हमीदाबी अय्युब खां यांच्यासह 9 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. प्रभाग 2 ब मधून भाजपच्या जयश्री नितीन महाजन या बिनविरोध निवडून आल्या असून भाजपने नगरसेवक पदाचे त्यांच्या माध्यमातून खाते उघडले आहे.

आज माघारीची अंतिम तारीख असल्याने सकाळपासूनच अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. यावेळी कोटींच्या घरात मोठी आर्थिक उलाढाल यनिमित्ताने झाल्याची चर्चा दिवसभर सुरु होती. दुपारी एक वाजेपर्यंत कोणत्याही राजकीय हालचाली नसताना अर्ध्या तासात महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाठा गट तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व नगराध्यक्ष पदाचे काही उमेदवारांची बैठक झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवार मनीषा पवार यांच्या समर्थनार्थ या उमेदवारांनी माघार घेतली असल्याची चर्चा शहरात आहे. यामुळे नगराध्यक्ष पदाची सुरुवातीला भाजपला सोपी वाटणारी निवडणूक आता अटीटतीची व चूरशीची ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग 2 ब मधून भाजपच्या उमेदवार विजयी झाल्याने 12 प्रभागातील एकूण 23 नगरसेवकांच्या जागासाठी 97 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याचे चित्र आज माघारीनंतर स्पष्ट झाले. प्रभाग निहाय उमेदवार

*प्रभाग 1अ* 

मनोज अशोक महाजन भाजप, भावना भूषण पाटील काँग्रेस, नितीन भगवान महाजन अपक्ष, राहुल कैलास महाजन अपक्ष 

1(ब)-सपना योगेश महाजन भाजप, सुचिता निलेश महाजन अपक्ष, मोहिनी राहुल महाजन अपक्ष

*प्रभाग 2अ* 

राजेश सुधाकर शिंदे भाजप, राजेंद्र रामदास महाजन अपक्ष, शेख खालिद हुसेन अपक्ष, मन्यार शेख गुलजार शेख अपक्ष

2(ब) जयश्री नितीन महाजन भाजप बिनविरोध

*प्रभाग 3अ*

किशोर सुधाकर महाजन अपक्ष, अरुण दत्तात्रय आस्वार भाजप, शेख अल्तामश इब्राहिम अपक्ष, राजू अशोक गायकवाड राष्ट्रवादी अ प गट

3(ब) संगीता सूर्यकांत अग्रवाल अपक्ष, योगिता भूषण महाजन भाजप

*प्रभाग 4अ* 

अर्चना योगेश पाटील भाजप, छाया ज्ञानेश्वर महाजन राष्ट्रवादी अ प गट

4(ब ) खान खालील खान अकील अपक्ष, निखिलेश जयवंतराव गांगावे अपक्ष, गणेश प्रभाकर पाटील भाजप, नीलम गोपाल बिरपण राष्ट्रवादी अ प गट

*प्रभाग 5 अ* 

पंकज वसंत वाघ भाजपा, सुशीला मधुकर मेढे काँग्रेस, सुजल रवी छपरीबंद अपक्ष, नरेंद्र विश्वनाथ वाघ राष्ट्रवादी अ प गट 

5(ब ) विद्या अरुण शिंदे भाजप, सालेहा कौसर अल्ताफ खान राष्ट्रवादी अ प गट, अपक्ष - आरती बाबुराव पाटील, ज्योती बाळू शिरतुरे, रेहाना बी असदुल्ला खान अंजली प्रमोद महाजन काजी सजेदा बी सदरोद्दीन

*प्रभाग 6अ * 

खान सुम्ययाबी जाविद राष्ट्रवादी अ प गट, खान शमीम बानो युसूफ अपक्ष, खादीजा बी बाबू शेख भाजप, शेख फरीदा बी शेख लुकमान काँग्रेस, खान रेहाना बी असदुल्ला अपक्ष

6(ब ) काजी गयासोद्दीन सदरोद्दीन भाजप, खान असदुल्ला नासिर खान अपक्ष, आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद राष्ट्रवादी अ प गट, शेख कामिल शेख राउफ एमआयएम, मोहम्मद रेहान अ मुतल्लीब काँग्रेस

*प्रभाग 7अ* 

शमीम बानो युसूफ खान अपक्ष, साजेदा बी शेख शरीफ शिवसेना शिंदे गट, सानिया परवीन शेख सऊद राष्ट्रवादी अ प गट, शेख नासिर बी हुसेन अपक्ष, शगुप्ता परवीन शेख आरिफ अपक्ष

7 (ब ) मोहम्मदस्मि मोहम्मद आसिफ राष्ट्रवादी अ प गट, प्रफुल्ल जगदीश महाजन शिवसेना शिंदे गट, खान मुजहीद उस्मान खान एमआयएम, युसूफ खान इब्राहिम खान अपक्ष, अय्युब खान भुरे खान काँग्रेस, दीपक दिलीप जाधव अपक्ष

*प्रभाग 8अ* 

इरफान रुबीना बी शेख राष्ट्रवादी अ प गट, शे मुमताज बी शे अय्युब एमआयएम, खाटीक सुरय्या बी मो रशीद काँग्रेस

8 (ब ) शेख हमीद शेख शफी अपक्ष, शेख सादिक अब्दुल नबी राष्ट्रवादी अ प गट, मन्यार मोहम्मद खालिद शेख भाजप, खा इम्रान खां इकबाल खां काँग्रेस, शेख नाहिद शेख ताहेर अपक्ष

*प्रभाग 9 अ* 

 वाजेदा बी शेख सादिक अपक्ष, खान शाहीन परवीन सफदार काँग्रेस, जाकेर बी असगार खां राष्ट्रवादी अ प गट 

9(ब ) दारा मोहम्मद जाफर मोहम्मद राष्ट्रवादी अ प गट, शेख मोहसीन शेख रियाज अपक्ष, शेख सुलतान शेख इसा एमआयएम, अब्दुल मुतल्लीब रफिक काँग्रेस

*प्रभाग 10 अ* 

संगीता जगदीश घेटे भाजपा, रंजना योगेश गजरे राष्ट्रवादी अ प गट, स्मिता अमोल तायडे अपक्ष, अनिता मुरलीधर तायडे काँग्रेस

10 (ब )गोपाल रत्नाकर बिरपण राष्ट्रवादी अ प गट, रमण लक्ष्मण तायडे अपक्ष, राजेंद्र मधुकर अटकाळे अपक्ष, वैभव संतोष देशमुख शिवसेना शिंदे गट 

*प्रभाग 11अ*

 सीमा आरिफ जमादार भाजप, दीपाली भूषण तायडे अपक्ष, सरस्वती श्रीराम बडगुजर अपक्ष, तसलीम बानो सुभान पठाण राष्ट्रवादी श प गट

11(ब ) जगन्नाथ दुर्गादास शिवलकर अपक्ष, सोपान साहेबराव पाटील भाजप, हरीश वासुदेव जगताप अपक्ष, सुनील सोपान महाजन अपक्ष, गणेश सोपान पाटील राष्ट्रवादी श प गट, ज्ञानेश्वर दिवाकर वाणी अपक्ष

*प्रभाग 12 अ*

 रिया शीतल पाटील भाजपा, रेखा रमेश महाजन शिवसेना उबाठा, प्रमिला चुडामण पाटील अपक्ष 

12 (ब ) प्रणित गणेश महाजन अपक्ष, ज्ञानेश्वर दिवाकर वाणी अपक्ष, विशाल मुकुंदा तायडे अपक्ष, राजेंद्र पंढरीनाथ चौधरी भाजपा.