प्रतिनिधी / रावेर
रावेर नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्याकडे जात आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराने आघाडी घेतली आहे. प्रभाग क्र. १०( ब ) मधून रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार रमण तायडे यांचा प्रचाराचा झंझावात सुरु आहे. प्रभागातील समस्यांची जाण असल्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आपला एकमेव अजेंडा असल्याचे मतदारांना सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या विजयाची गणिते जुळून येत असून मतदारांचा विश्वास आपण सार्थ ठरवू असे असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
या प्रभागात चार उमेदवार रिंगणात असून रमण लक्ष्मण तायडे यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे. शिक्षक असलेल्या श्री. तायडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांचा त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. उच्च शिक्षित असल्याने विकासाचे असलेले व्हिजन, मतदारांशी असलेला जनसंपर्क, प्रभागासह विविध अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी असलेला सलोख्याचे संबध, त्यांच्यात असलेली आपलेपणाची भावना व शांत आणि संयमी स्वभाव या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. याच्या बळावर भावीकाळात नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागाला आदर्श बनविणार असल्याचा संकल्प त्यांनी केला आहे. उच्च शिक्षित, मनमिळावू स्वभाव, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत धावून जाणारा, प्रसंगी मदत करणारा उमेदवार म्हणून रमण तायडे परिचित आहेत. नागरिकांच्या समस्यांची जाण असल्याने या समस्या भावी काळात ते मार्गी लावतील असा मतदारांना विश्वास आहे. श्री तायडे यांच्यामागे जनमत असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांशी ते तुल्यबळ लढत देतील अशी मतदारांमध्ये चर्चा सुरु आहे. उमेदवार रमण तायडे यांचा प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत असलेला जनसंपर्क व वेळोवेळी नागरिकांचे सोडवलेले प्रश्न यामुळे या प्रभागातून त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे.